Architecture College
Architecture CollegeDainik Gomantak

Architecture College: आर्किटेक्चर विद्यार्थ्यांचा थेट वर्गावरच बहिष्कार

प्राचार्य पळाले :‘सीओए’ रजिस्ट्रेशन क्रमांकच नाही

Architecture College: कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा (सीओए) रजिस्ट्रेशन क्रमांक आर्किटेक्चर महाविद्यालयाकडून काहींना देण्यात आलेला नाही. त्यामुळे आज विद्यार्थ्यांनी वर्गांवर बहिष्कार टाकला. विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या कार्यालयावर धडक दिली, मात्र प्राचार्यांनी तेथून काढता पाय घेतला.

Architecture College
Goa Police: रुमडामळ परिसरात ‘गॅंगवॉर’ची भीती; पोलिस प्रशासन सतर्क

एक वर्ष उलटले तरी विद्यार्थ्यांना रजिट्रेशन क्रमांक सीओएकडून मिळवून देण्यात हे महाविद्यालय अपयशी ठरत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. जोपर्यंत प्राचार्यांकडून स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत हा बहिष्कार चालूच ठेवण्‍यात येईल, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होत आले आहे, मात्र सीओएकडून त्‍यांना अजूनही रजिस्ट्रेशन क्रमांक देण्‍यात आलेला नाही.

Architecture College
Goa Crime News: मुलीचा मृत्यू घातपातच; पुन्हा शवचिकित्‍सा करा!

या क्रमाकामुळे ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. मात्र क्रमांकच मिळाला नाही तर अभ्यासक्रम करून व्यर्थच.

आर्किटेक्चर पदवी असूनही जर सीओएचा रजिस्ट्रेशन क्रमांक नसेल तर ही पदवी वैध धरली जात नाही, अशी माहिती काही आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी दिली. त्यामुळे त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. अनेकदा प्राचार्यांना या सीओए क्रमाकांबाबत विचारणा करण्‍यात आली, मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्‍यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com