Goa criminal MLA Dainik gomantak
गोवा

गोव्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचे आमदार वाढले

2007 साली निवडून आलेल्या 40 पैकी 9 आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद होते

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. अशातच असोसिएशन ऑन डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने देखील एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. यात अशी माहिती समोर आली आहे की, राज्यात सध्या 11 आमदारांवर अपहरण, बलात्कार, खुनाचा प्रयत्न करणे, लैंगिक अत्याचार तसेच अन्य अजामीनपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. याप्रकरणी या आमदारांवर विविध पोलीस (police) स्टेशनमध्ये गुन्हे नोंद आहेत.

आपला आमदार (MLA) हा स्वच्छ पार्श्वभूमीचा, चांगल्या चारित्र्याचा असावा, अशी मतदारांची अपेक्षा असते. मात्र, गेल्या काही वर्षांत राज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2007 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विविध गुन्हे नोंद असलेले 9 आमदार निवडून आले होते. तर गेल्यावेळी, 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत हा आकडा 11 वर पोहोचला आहे. भाजपच्या 5 आमदारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. पाहायला गेल तर यात भाजप आघाडीवर आहे. काँग्रेस (Congress) 2 आमदारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. गोवा फॉरवर्डच्या 1 आमदारावर गंभीर गुन्हा नोंद आहे, तर राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या देखील एका आमदारावर गुन्हा दाखल आहे.

2017 च्या विधासभेचा कार्यकाळ संपत आलेला आहे. मात्र या विधानसभेत विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले 11 आमदार जनतेच्या सेवेसाठी कार्यरत होते. तसेच 2007 साली निवडून आलेल्या 40 पैकी 9 आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद होते. आता यात वाढ होताना दिसत आहे. ही राज्यातील जनतेसाठी लाजिरवाणी गोष्ट मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT