Yuri Alemao | Goa Government Jobs Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: नाताळ सणावर निर्बंध घालणे अनुचित; मध्यप्रदेश भाजपचा निर्णय निंदनीय

Yuri Alemao: युरी : नाताळ सणावर निर्बंध घालणे अनुचित; गोमंतकीयांनीही सावध व्‍हावे

दैनिक गोमन्तक

Yuri Alemao: नाताळ सणावर निर्बंध जारी करणाऱ्या मध्यप्रदेश भाजप सरकारच्या परिपत्रकाचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. शालेय मुलांना या उत्सवात भाग घेणे, ख्रिसमस ट्री सजवणे, सांताक्लॉजसारखे कपडे घालण्‍याला सरकारची पूर्वपरवानगी घेण्याचे बंधनकारक करणे आणि उल्लंघन झाल्यास कारवाईस सामोरे जाण्याचा इशारा देणे हे निंदनीय आहे.

यातून बोध घेऊन पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवेळी मतदारांनी सावध रहावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले. शाळांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर निर्बंध लादणाऱ्या मध्य प्रदेशातील भाजप सरकारच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देत युरी यांनी भाजप सरकार हुकूमशाही कारभार चालवत असल्याचा गंभीर आरोप केला.

सर्व मुलांना सर्व भारतीय सण मुक्तपणे साजरे करू द्या. प्रत्येक सण आणि संस्कृतीचा आदर करणारा सर्वसमावेशक समाज असणे गरजेचे आहे. सण आणि परंपरांना राजकीय अजेंड्यापासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे, असेही युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

मध्यप्रदेश भाजप सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात आश्‍चर्यकारक असे काहीच नाही. गोव्यातील भाजप सरकारचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यांनी आधीच गोव्यातील लग्नसोहळे आणि कौटुंबिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यास सुरूवात केलेली आहे, असे युरी यांनी म्‍हटले आहे.

2024 मध्ये गोमंतकीयांबरोबरच समस्‍त देशवासीयांना एक संधी चालून येत आहे. आपण सर्वजण आपल्या लोकशाही आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहुया. सर्वांनी फुटीरतावादी शक्तींचा पराभव करण्याची शपथ घेऊया. हुकूमशाही राजवटीला पराभूत करण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे, असे आवाहनही युरी आलेमाव यांनी गोमंतकीयांना केले आहे.

गोमंतकीयांनी या हुकूमशाही परिपत्रकाकडे अत्यंत सावधगिरीने पाहणे गरजेचे आहे. नजीकच्या काळात आपल्यासाठीसुद्धा हेच वाढून ठेवले आहे. हा विषाणू लवकरच संपूर्ण देशात पसरेल आणि हे थांबवायचे असेल तर २०२४ मध्ये सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Transport Rules: रेंट-ए-कॅबमधील थार वाहनांवर निर्बंध लागू; 15 जुलैपासून एआय कॅमेऱ्यांद्वारे होणार स्वयंचलित चलन

Goa Casino: मांडवी नदीत महाकाय कॅसिनो जहाज प्रवेशास स्थगिती कायम; सुनावणी 18 ऑगस्टपर्यंत तहकूब

Heavy Rain in Goa: बाणावली येथे घरावर झाड कोसळून एक जखमी, सासष्टीत ठिकठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार; छपरासह साहित्याचे नुकसान

Ugvem Highway Landslide: उगवे महामार्गावर पुन्हा कोसळली दरड! आठवड्यातील तिसरी घटना; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक 9चा फेरविकास अखेर रखडला, युद्धाचा फटका; 1,300 कोटींच्या निधीला केंद्राकडून नकार

SCROLL FOR NEXT