Morjim Beach: ‘सायलेंट झोन’ रात्री दहानंतरही अशांत

Morjim Beach: कासवसंवर्धन क्षेत्रात ध्वनिप्रदूषण: संगीत पार्ट्या, दारूकामाचीही आतषबाजी
Goa Night Life:
Goa Night Life: Dainik Gomantak

Morjim Beach: मोरजी व आश्वे - मांद्रे हे दोन किनारे संवेदनशील जाहीर केल्यानंतरही रात्री दहानंतर ते अशांत बनवण्याचे काम संगीत रजनी आयोजित करणारे करत आहेत. शिवाय दारूकामाची आतषबाजीही करण्यात येत आहे.

Goa Night Life:
Goa News: बॉक्‍समध्‍ये सापडले दहा दिवसांचे अर्भक!

नाताळाच्या पूर्वसंध्येला अनेक आयोजकांनी किनारी भागातील रेस्टॉरंट क्लबमध्ये संगीत रजनी आयोजित केल्या आहेत. कोणत्याही प्रकारची परवानगी नसतानाही कायदे धाब्यावर बसवून किनारी भागात रात्री दहानंतरही संगीत पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे.

ध्वनिप्रदूषण करणाऱ्या संगीत रजनींची रेलचल सध्या किनारी भागात रात्री दहानंतर फेरफटका मारल्यानंतर दिसून येते. मोरजी, आश्वे - मांद्रे हे दोन किनारी कासवसंवर्धन मोहिमेमुळे ‘सायलेंट झोन’ म्हणून जाहीर केले आहेत, परंतु या दोन्ही किनाऱ्यांवर रात्री १० नंतर संगीत रजनी चालू आहेत.

Goa Night Life:
Goa Traffic Issue: उड्डाणपुलाच्या कामामुळे होणारी कोंडी टाळणार

तक्रार करणाऱ्यांना धमक्या

नाताळाच्या पूर्वसंध्येला आणि नाताळाच्या दिवशी ठिकठिकाणी पोलिस तैनात केले, परंतु या पोलिसांनी कधी ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. ध्वनिप्रदूषणाविरुद्ध कोणी तक्रार केल्यास त्यांना आयोजकांकडून धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबण्याचे प्रकार घडत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com