Dam  Dainik Gomantak
गोवा

Water Shortage: गोवेकरांसाठी महत्वाची बातमी ! धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

गोमन्तक डिजिटल टीम

Water Shortage यंदा वाढलेल्या उन्हाची तीव्रता आणि तापमानामुळे गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असून पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी पुरेल का? हा प्रश्न गंभीर बनत आहे.

पंचवाडी धरणात केवळ 18 टक्के तर अंजुणेत 23 टक्के पाणी उरले आहे. जर पाऊस वेळेत सुरू झाला नाही तर राज्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता आहे.

जलस्रोत खात्याच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या साळावली धरणामध्ये 2022 मध्ये आजअखेर 53 टक्के पाणी होते. यंदा ते केवळ 37.2 टक्के शिल्लक आहे.

आठ दिवसांपूर्वी या धरणात ४१.७३ टक्के पाणी होते. तर अंजुणे धरणामध्ये २०२२ मध्ये ३६ टक्के पाणी होते ते २०२३ म्हणजे आज रोजी केवळ २३ टक्के असून आठ दिवसांपूर्वी २५.९९ टक्के पाणी होते. हीच स्थिती इतर आमठाणे, पंचवाडी, चापोली आणि गावणे धरणांच्या बाबतीत आहे.

गेल्या काही वर्षांतला अनुभव पाहता पाऊस जूनच्या मध्यापर्यंत राज्यात दाखल होत नाही. ही परिस्थिती यंदा आल्यास राज्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागेल.

काटकसरीने पाणी वापरा

धरणातील पाणीसाठा कमी होत आहे, हे खरे असले तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. राज्याला आवश्यक असणारा पाणीसाठा आपल्याकडे उपलब्ध आहे.

पण नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. सध्याचा पाणीसाठा वाढवण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mopa Airport: ‘मोपा’मुळे दक्षिणेतील पर्यटनाचा विचका; व्‍यवसाय घटल्याने व्‍यावसायिक चिंतेत

Goa Tourism: परदेशी पावलं गोव्याच्या दिशेने वळणार; यंदा विदेशी पर्यटकांची संख्या वाढणार

Pitrupaksha 2024: श्राद्ध आणि महालय यात फरक आहे का? सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय?

Ponda Crime: संसार सोडून 'त्या' दोघी गोव्यात, कारमधून आलेल्या तरुणांनी केलं अपहरण; तपासात उघड झाला चक्रावून टाकणारा घटनाक्रम

Goa Tourism: परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारचं खास प्लॅनिंग; कोविड नंतर आकड्यात झालीये का वाढ?

SCROLL FOR NEXT