Important discussion in Archbishop- Goa Governor meeting  Dainik Gomantak
गोवा

आर्चबिशप-राज्यपाल भेटीत महत्त्वपूर्ण चर्चा

केरळमधील एका बिशपांनी अन्य अल्पसंख्याक समाजातून ख्रिस्ती समुदायावर होत असलेल्‍या अन्यायाबाबत जाहीर वाच्यता केल्याने राष्ट्रीय पातळीवर वाद निर्माण झाला होता.

दैनिक गोमन्तक

पणजी: आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव (Archbishop of Goa) यांनी काल (गुरुवारी) राजभवनावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (P.S Sreedharan Pillai) यांची भेट घेतली. ही भेट निव्वळ सदिच्छा भेट नव्हती, तर त्यापलीकडील चर्चा करणारी होती, अशी माहिती मिळाली आहे.

केरळमधील एका बिशपांनी अन्य अल्पसंख्याक समाजातून ख्रिस्ती समुदायावर होत असलेल्‍या अन्यायाबाबत जाहीर वाच्यता केल्याने राष्ट्रीय पातळीवर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी पिल्लई यांनी बिशपांना तसे म्‍हणायचे नव्हते, ते वेगळ्या विषयी मांडणी करत होते असे सांगून चर्चेतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला होता.

या साऱ्या पार्श्वभूमीवर आर्चबिशपांनी राज्यपालांची घेतलेली भेट ही त्याचमुळे केवळ सदिच्छा भेटीपलीकडील ठरली आहे. राज्यपालांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आर्चबिशप त्यांना पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी त्या भेटीची गणना सदिच्छा भेट या सदरात केली होती. त्यानंतर राज्यपाल पिल्लई हे आर्चबिशपांच्या निवासस्थानी जाऊन भेटले होते. त्यालाही सदिच्छा भेट असेच संबोधण्यात आले होते.

आता राज्यपालांनी विविध सामाजिक संस्था आणि डायलिसीस रुग्णांना विशेष निधीतून मदत जाहीर केल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी आर्चबिशप राज्यपालांना भेटले, असे राजभवनातून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले असले तरी आर्चबिशप आणि राज्यपाल यांची ख्रिस्ती समुदायाचे म्हणणे याविषयावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

वारंवार भेटी

निवडणुकीआधी मतदार जागृती व मतदार साक्षरता हे चर्च आपले कर्तव्य मानते. त्यामुळे प्रार्थनासभांतून मार्गदर्शन केले जाते. त्यातून मतदाररुपी भाविकांना मतदानाची नेमकी दिशा ठरवण्यास मात्र मदत होत असते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात तशी चर्चही भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. राज्यपाल आणि आर्चबिशप यांच्या अलीकडे वारंवार होऊ लागलेल्या भेटी त्याचमुळे चर्चेच्या ठरू लागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damodar Saptah: जय जय रामकृष्ण हरी! दामोदर भजनी सप्ताह; 24 तास साखळी पद्धतीने भजनाची परंपरा

Goa Road Safety: '20 कोटी' दंड वसूल, मग अपघातप्रवण क्षेत्रे का सुधारली नाहीत? आलेमाव यांचा विधानसभेत सवाल

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

SCROLL FOR NEXT