पणजी: कॉंग्रेसने (Congress) अखेर निवडणूकविषयक (Goa Assembly Election) सारे निर्णय घेण्यासाठीची सर्व सूत्रे आमदार लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांच्याकडे दिली. निवडणूक समन्वय समितीच्या अध्यक्षपदी फालेरो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीविषयी त्यांना विचारले होते. मात्र, त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे वरिष्ठ निवडणूक निरीक्षकपदाची जबाबदारी देऊन गोव्यात पाठविलेले पी. चिदंबरम यांची या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कॉंग्रेस भाजप विरोधी आघाडी राज्यात आकाराला आणणार की नाही या घोळात 20 दिवस वाया गेले आहेत. दरम्यानच्या काळात तृणमूल कॉंग्रेसने राजकीय अवकाश भरण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे कॉंग्रेसने निवडणूक निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्यासाठी ही समिती नियुक्त केली आहे. गेल्या निवडणुकीवेळी फालेरो यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती आणि त्यांनी 17 आमदार निवडून आणले होते.
प्रचार समिती अध्यक्षपदी आलेक्स रेजिनाल्ड
आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहअध्यक्षपदी संगीता परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य असे - आल्तिन गोम्स, धर्मा चोडणकर, प्रिन्स जेकब, दामोदर शिरोडकर, डिक्सन वाझ, आर्मांदो गोन्साल्वीस, युरी आलेमाव, अससियाना रोमन रॉड्रिग्ज, अमरनाथ पणजीकर, ग्लायन सिल्वेरा, सुधीर कांदोळकर, सोनिया फर्नांडिस, नौशाद चौधरी, शॉन ग्रासीयस, सुनील कवठणकर.
प्रसिद्धी समिती अध्यक्षपदी ॲड. चोडणकर
ॲड. चंद्रकांत चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्था साल्ढाणा यांच्या सहअध्यक्षतेखाली प्रसिद्धी समिती नेमण्यात आली आहे. सदस्य असे- गुरुदास नाटेकर, संकल्प आमोणकर, विठोबा देसाई, बाबी बागकर, आग्नेल फर्नांडिस, शुभम फळदेसाई, जनार्दन भंडारी, त्रिबोलो सोझा, विशांत काकोडे, ज्यो डायस, विजय भिके, शंकर किर्लपालकर, वरद म्हार्दोळकर, एव्हरसन वालेस, सुझी फर्नांडिस, एथेल लोबो, डोरीस टेक्सेरा, रामकृष्ण जल्मी, तन्वीर खतीब, दया पागी, अभिजित देसाई, मोहन धोंड, शेख शब्बीर.
जाहीरनामा समितीचे ॲड. खलप अध्यक्ष
ॲड. रमाकांत खलप यांची जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली असून एल्विस गोम्स सहअध्यक्ष आहेत. अन्य सदस्य असे- दत्ता नाईक, ॲड कार्लोस आल्वारीस फेरेरा, अविनाश तावारीस, ॲड. क्लिओफात कुतिन्हो, अजय ठाकूर, ॲड. यतीश नाईक, सिद्धार्थ कारापूरकर, बीना नाईक, डॉ. राजेंद्र सावर्डेकर, स्वाती केरकर, जोसेफ वाझ, रामा काणकोणकर, विष्णू मोरजकर, प्रा. लिंडिया मेनन, अलू गोम्स परेरा, शेख इफ्तीकार.
निमंत्रकपदी एम. के. शेख
निवडणूक समन्वय समितीच्या निमंत्रकपदी एम. के. शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य असे- पी. चिदंबरम, दिनेश गुंडू राव, प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, ॲड. रमाकांत खलप, ॲड. चंद्रकांत चोडणकर, संगीता परब, एल्विस गोम्स, मार्था साल्ढाणा, प्रकाश राठोड, सुनील हनुमन्वर, मन्सूर खान.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.