Goa Beaches Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: 'किनारी भागात अशांतता वाढलीय, मूळ गोव्याचे सौंदर्य कुठेतरी हरवतंय', पर्यटकाने शेअर केलेला अनुभव वाचा

Goa Tourism Challenges: गोवा किनारी पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी त्याच्या पलीकडे जाऊन बघण्यासारखे आहे. इथले मंदीरं, चर्च आणि घरं ही अभ्यासाची ठिकाणं आहेत.

Sameer Panditrao

यशवंत मामलेदार

Goa cultural : फेब्रुवारीनंतर उन्हाची तीव्रता वाढू लागते. उन्हाची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा या वातावरणात तुलनेने गरम राहणाऱ्या गोवा, कोकण परिसरात जाताना बराच विचार करून जावं लागतं.

कामानिमित्य माझी दोन तीन महिन्यातून एकदा गोव्याला फेरी होतेच. एकदोन दिवस काम करून इतर दिवस मी गोव्यातील वेगवेगळा परिसर, इथले ग्रामीण जीवन जीवन, खाद्य संस्कृती पाहायचा प्रयत्न करतो.

मला स्वतःला गोवा फिरण्यासाठी पावसाळा थोडासा कमी झाला की तेंव्हापासून ते फेब्रुवारी पंधरा तारखेपर्यंत, जास्तीत जास्त फेब्रुवारी अखेरपर्यंत हा काळ आवडतो. पावसाळ्यात गोवा सुंदर दिसतोच याबद्दल शंका नाही पण इथल्या पावसात फिरण्यापेक्षा छानपैकी एका टिपिकल कोकणी पद्दतीच्या किनाऱ्याकडच्या रिसॉर्टमध्ये थांबून खवळलेला समुद्र आणि कोसळणारा पाऊस यांचे द्वंद्व पाहायला मजा येते.

मार्च महिना निम्मा होत आला. अलीकडेच कामानिमित्त्य दक्षिण गोव्यात फेरी झाली. थोडावेळ पणजी परिसरातही घालवला. आताही पर्यटकांचा चांगला ओघ दिसून आला.

तापमान भलतेच असूनही दुरून लोक येताहेत. आता पर्यटनाच्या संकल्पनातही भरपूर बदल झालेला आहे. एक गोष्ट जाणवते म्हणजे की मूळच्या गोव्याचे सौन्दर्य कुठेतरी हरवत आहे. किनारी भागातील पर्यटनात अशांतता वाढत चालली आहे.

कोकणाप्रमाणेच गोवासुद्धा नैसर्गिकदृष्ट्या प्रचन्ड संपन्न आहे. गेले काही वर्षांपासून इथले परिसर पाहत असल्यामुळे मला इथल्या संस्कृतीबद्दल कुतूहल वाटते.

पण पर्यटनवाढ भलत्याच अंगाने होत गेल्याने इथे व्यवसायासाठी बाहेरून आलेल्या लोकांची संख्या बरेच वाढली. यावर विशेष नियंत्रण नसल्याने गुन्हे आणि लूटमार वाढू लागली. काही किनारी भागात सर्रास एजंट लोक येऊन इथे येऊन अंमली पदार्थ किंवा कॉल गर्ल्ससाठी मागे लागतात.

गोवा किनारी पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी त्याच्या पलीकडे जाऊन बघण्यासारखे आहे. इथले मंदीरं, चर्च आणि घरं ही अभ्यासाची ठिकाणं आहेत. या वास्तुशास्त्राचा पर्यटनात प्रामुख्याने समावेश केला गेला पाहिजे. गोव्याच्या एका गावात विविध संस्कृतींचे मिश्रण पाहायला मिळणे ही गोव्यातील खासियत आहे. याबाबतही विचार झाला पाहिजे.

एक नक्की आहे कि गोव्यात पर्यटकांचा सतत ओघ असतो आणि त्यामुळे इथे पैसे मिळताहेत. पण फक्त पैसे मिळवण्याचा नावाखाली काहीही होऊ नये. याबाबत सगळ्यांनीच गांभीर्यांने विचार करायला हवा. इतकी वर्षे जात असून मला गोवा सतत खास वाटत आला आहे परंतु हरवत चाललेल्या शांततेचे काहीतरी केलं पाहिजे,.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT