IMD predicts yellow alert over Goa on Sunday  Dainik Gomantak
गोवा

Yellow Alert: गोव्यात रविवारी येलो अलर्ट, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

गोव्यात मागील काही दिवसांपासून पावसाची उसंत

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. येत्या रविवारी (दि.24) गोव्यात हवामान खात्याने (IMD Goa) येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

हवामान खात्याच्या दैनंदिन अहवालानुसार 22, 23, 25 आणि 26 जुलैला काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, 24 जुलै रोजी पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर, दक्षिण गोवा दोन्ही जिल्ह्यात पावसाचा जोर दिसून येईल. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, जूनचा पूर्वाधात आणि जुलैच्या सुरवातीपासून गोव्यात पावासाचा जोर अधिक होता. पण, मागील काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pankaj Dheer: महाभारतातील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

‘त्या’ स्वप्नाला मूर्त स्वरुप येण्यापूर्वीच 'पात्रांव रवी नाईक' यांनी जगाचा निरोप घेतला

'चाणक्य हरपला'! फोंड्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शोककळा

Goa Today's News Live: सार्वजनिक सुट्टीमुळे दावर्ली पंचायत निवडणूक रद्द, उडाला गोंधळ

Footprints and Frames: मुंबई ते गोवा मार्गावरील कथा पहा चित्रांमध्ये! नॉस्टेल्जीयाच्या पाऊलखुणा

SCROLL FOR NEXT