पोलिसांविरुद्ध ‘एसपीसीए’कडे 80 तक्रारी

57 प्रकरणे गंभीर स्वरूपाची: मात्र, एकाही प्रकरणाची चौकशी पूर्ण नाही
police
police Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पोलिस कर्मचाऱ्यांकडून सतावणूक झाल्याप्रकरणी पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणकडे (एसपीसीए) गेल्या वर्षभरात 80 तक्रारी दाखल झाल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी पोलिस निरीक्षकांविरोधात असून त्यातील 57 तक्रारी पोलिसांच्या वर्तणुकीसंदर्भात गंभीर स्वरूपाच्या आहेत. आतापर्यंत एकाही तक्रारीची चौकशी पूर्ण झाली नसून प्राधिकरणानेही खात्यांतर्गत चौकशीसाठी शिफारस केलेली नाही.

(80 complaints to 'SPCA' against police in goa)

police
स्टेशन उभारणीला कोकण रेल्वे महामंडळाकडून प्राधान्य

पोलिस स्थानकात नोंद झालेल्या तक्रारींवरील तपासकामात दिरंगाई तसेच तक्रारदाराला वारंवार चौकशीला बोलावून होणाऱ्या सतावणुकीसंदर्भात, चौकशीच्या नावाखाली नाहक मारहाण केल्याच्या, तपासकामाबाबत असमाधानी तसेच संशयिताला पाठिशी घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध या तक्रारी आहेत. सर्वाधिक तक्रारी या पोलिस निरीक्षकांविरुद्ध (37) आहेत. एक तक्रार पोलिस महासंचालकांविरुद्ध दाखल झाली आहे. या तक्रारींमध्ये पोलिस अधीक्षक - 11, उपअधीक्षक - 3, उपनिरीक्षक - 21, सहाय्यक उपनिरीक्षक - 3, हवालदार - 2 तर पोलिस कॉन्स्टेबल - 12 यांचा समावेश आहे.

तक्रारदारांच्या नशिबी हेलपाटे!

या प्राधिकरणावर निवृत्त न्यायमूर्ती तसेच दोन सदस्यांची काही महिन्यांपूर्वीच नियुक्ती झाली असल्याने या तक्रारींवरील सुनावणी सुरू झाली आहे. पोलिसांना ड्युटीमुळे सुनावणीला उपस्थितीस अडचणी येत असल्याने वारंवार ही सुनावणी पुढे ढकलली जाते. तक्रारदारांना मात्र हेलपाटे मारण्याची पाळी येते.

...तरीही तक्रारी प्रलंबित !

ज्या पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राधिकरणाकडे तक्रारी प्रलंबित आहेत, त्यातील काहीजण पोलिस सेवेतून निवृत्तही झाले आहेत. त्यांच्याविरुद्धच्या या तक्रारीचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना निवृत्तीनंतरचे इतर लाभही मिळणे मुष्किल बनले आहे. गंभीर आरोप असलेल्यांची खात्यांतर्गत चौकशीही केलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com