Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: येत्या चार दिवसात राज्यात पावसाची शक्यता

दिल्लीसह अनेक ठीकाणी मुसळधार पाऊसाची हजेरी

दैनिक गोमन्तक

देशाची राजधानी दिल्लीसह अनेक ठीकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. यामूळे देशातील अनेक भाग जलमय झाले आहेत. यातच आता गोवा राज्यातही येत्या चार दिवसात गडगडाटासह पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

(IMD Goa predict light rain upcoming for days )

वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात 10, ते 14 ऑक्टोबरदरम्यान राज्यातील बहुतेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामूळे राज्यातील अनेक ठीकाणी सुरु असलेल्या खरीप हंगामातील पिक काढणीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

आज सकाळी पणजी शहरासह राज्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामूळे सकाळी कामासाठी बाहेर पडल्या नागरिकांनी आडोशाला थांबल्याचे चित्र होते. यामूळे काहीवेळ शहरातील रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ थंडावली होती.

पावसामुळे देशात अनेक ठीकाणी जनजीवन विस्कळीत

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच काही ठीकाणी जोराच्या पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक कोंडीचा सामानाही नागरिकांना करावा लागत आहे. तर उत्तर प्रदेशात पावसामुळे स्थिती बिकट आहे. आणि अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

3 कोटी द्या, मंत्रीपद घ्या! आमदार-खासदारांना गंडा घालणाऱ्या ठगांचा पर्दाफाश; प्रियंका गांधींचा बनावट पीए बनून केली कोट्यवधींची मागणी

Iranian Ship Attack: कॅस्पियन समुद्रात हायव्होल्टेज ड्रामा! युक्रेनचा इराणी जहाजावर हल्ला, भडकलेल्या इराणचा झेलेन्स्कींना अल्टीमेटम; "किंमत चुकवावी लागणार!"

RCBच्या स्टार खेळाडूचा मोठा निर्णय! संघाला ठोकला रामराम; आता 'या' संघाकडून खेळताना दिसणार

Mormugao Municipality Waste Segregation Training: मुरगाव पालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कचरा वर्गीकरणाचे चार टप्पे; प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

Bicholim Food Court: डिचोलीतील 'फूड कोर्ट' अंधारात; दीड महिन्यापासून वीज दिवे बंद; व्यावसायिकांचा उदरनिर्वाह धोक्यात

SCROLL FOR NEXT