Illegal liquor Dainik Gomanta
गोवा

Patradevi Checkpost: खुर्च्यांच्या ट्रकमध्ये सापडलं दारुचं घबाड; पत्रादेवी चेकनाक्यावर 40 लाखांची दारु जप्त

अबकारी खाते अन् गोवा पोलिसांची संयुक्त कारवाई

दैनिक गोमंतक

गोवा राज्यातून अवैधरित्या दारु वाहतूकीवर निर्बंध असताना असे प्रकार घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पत्रादेवी चेकनाक्यावर खुर्च्या पुरवठा करणाऱ्या एका ट्रकमध्ये दारु साठा जप्त करण्यात आला असून , याची अंदाजे किमत सुमारे 40 लाखा असल्याचे समोर आली आहे.

(Illegal transport truck caught at Patradevi check post liquor worth 40 lakh seized)

मिळालेल्या माहितीनुसार आज पत्रादेवी चेकनाक्यावर नेहमीप्रमाणे माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु होती. या तपासणीवेळी एका ट्रकची तपाणी केली. याच्या दर्शनी भागात खुर्च्या रचल्या होत्या. मात्र आतील साहित्याची चाचपणी केली असता मात्र विदेशी बनावटीचा दारुसाठा असल्याचे लक्षात आले. अबकारी खात्याने या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच या कारवाईत तब्बल 40 लाखांची दारु जप्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.

कारवाईतील दारुसाठ्याची मोजदात सुरु आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या कारवाईतील दारुसाठा नेमका कोणत्या राज्यात जाणार होता. याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. तसेच कारवाईत अटक करण्यात आलेल्या युवकांची माहिती देखील मिळू शकलेली नाही. मात्र ही कारवाई अबकारी खाते अन् गोवा पोलिसांनी ही संयुक्तरित्या केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT