Illegal Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Illegal Liquor Seized: पत्रादेवी येथे 42.63 लाखांचे बेकायदेशीर मद्य जप्त; ट्रकचालक ताब्यात

Illegal Liquor Seized: मद्यसाठा आणि ट्रक असा एकूण ८१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Liquor Seized At Patradevi

पेडणे तालुक्यातील पत्रादेवी चेकनाक्यावर आज (बुधवारी) सकाळी पेडणे अबकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नॅशनल परमिट ट्रकची झडती घेतली असता ४२ लाख ६३ हजार रुपयांची बेकायदा दारू सापडली. हा मद्यसाठा आणि ट्रक असा एकूण ८१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रादेवी चेकनाक्यावर आज सकाळी एक ट्रक (एमएच ४० सीडी १८०१) ट्रक आला. ड्युटीवरील अबकारी अधिकाऱ्यांनी या ट्रकची तपासणी केली असता त्यात बेकायदा मद्यसाठा आढळून आला.

जप्त केलेल्या दारूमध्ये व्होडका प्रत्येकी १२ बाटल्यांच्या नगाप्रमाणे ४४० पेट्या (किंमत ३१ लाख ६८ हजार), व्होडका लहान आकाराच्या प्रत्येकी १८० पेट्या (किंमत ६ लाख ४८ हजार), किंगफिशर बीअरच्चा १४ पेट्या

(किंमत ३ लाख ४५ हजार), टुबर्ग बीअर ५० पेट्या (किंमत १ लाख २ हजार) असा समावेश होता. तसेच या दारूची वाहतूक करणारा ट्रकही जप्त घेण्यात आला आहे.

ट्रकचालक धर्मेंद्र अरीवार याला ताब्यात घेण्यात आले असून उत्तर गोवा अबकारी सुप्रीडेंट महेश कोरगावकर, कमिशनर अंकिता मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे अबकारी कार्यालयाचे निरीक्षक राजेश नाईक, उपनिरीक्षक वासुदेव गावस, महेश गावकर, भारत पागी, रुपेश रेडकर, विनित धोंड, आशिष फर्नांडिस यांनी ही कारवाई केली. अधिक तपास सुरू आहे.

पत्रादेवी चेकनाक्यावर वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. गोव्यातून परराज्यांत जाणाऱ्या वाहनांवर आमची कड़क नजर आहे. यापुढेसुद्धा ही मोहीम अशीच सुरू राहील आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती पेडणे अबकारी कार्यालयाचे निरीक्षक राजेश नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT