Goa BJP: भाजपच्या विकासामुळे काँग्रेसला मडगाव-पत्रादेवी-मडगाव प्रवास शक्य; इच्छुकांची मात्र बस चुकली

Congress Vs BJP Goa Politics: प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकाच बसमधून प्रवास केला.
Congress Vs BJP | Goa Politics
Congress Vs BJP | Goa PoliticsGoa BJP X

Congress Vs BJP Goa Politics

काँग्रेसने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावार राज्यात लोकसभा प्रचाराचा शुभारंभ केला. प्रचाराचा नाराळ फोडण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उत्तर गोव्यात हुतात्मा स्मारक पत्रादेवी आणि दक्षिणेत लोहिया मैदान मडगाव येथे भेट दिली. प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकाच बसमधून प्रवास केला.

भाजपने मात्र, काँग्रेसला भाजपच्या विकासामुळे मडगाव- पत्रादेवी - मडगाव प्रवास शक्य झाल्याचे म्हणत इच्छुकांची बस चुकली अशा शब्दात टीका केली.

'भाजपच्या डबल इंजिन सरकारने केलेल्या रस्ते विकासामुळे काँग्रेसला मडगाव येथून उत्तरेत पत्रादेवी येथे आणि परत मडगावात प्रवास करणे शक्य झाले. काँग्रेस सराकरच्या काळात त्यांना पहिल्यांदा झुआरी पूल आणि त्यानंतर मांडवी पूलावर थांबावे लागले असते. पण, अटल सेतू आणि नवीन झुआरी पूल भाजपच्या उत्तम प्रशासन आणि मोदी की गँरटीची उत्तम उदारहणे आहेत,' असे भाजपने एक्सवरील सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

Congress Vs BJP | Goa Politics
NSG Goa Blast Investigation: गोव्यातील स्फोटाचा एनएसजी तपास करणार, अधिकारी घटनास्थळी

जातीच्या मुद्यावरुन समाजाचे विभाजन करायला काँग्रेस आवडते. देशाच्या एकजुटीमुळे घाबरलेली काँग्रेस वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करते. पण, त्यांचे राजकारण नेहमीच बहुजन समाजाविरोधात राहिले आहे. महिला सक्षमीकरणाबाबतची त्यांची विधाने पोकळ आहेत.

भंडारी समाजातील मोठे नेत्यांना तिकीट नाकारण्यात आले त्यांची इंडि आघाडीची बस चुकली. पण, त्यांच्यासाठी बसमध्ये जागाच नव्हती हे नंतर लक्षात आहे. त्यांची जात आणि प्रामाणिकपणा याकडे काँग्रेसने दुर्लेक्ष केले आहे. मतदार त्यांनी धडा शिकवतील, असे भाजपने दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

Congress Vs BJP | Goa Politics
Francisco Sardinha: विरियातो यांना शुभेच्छा! 'आता मी फक्‍त आराम करणार'- फ्रान्‍सिस सार्दिन

पत्रादेवी हुतात्मा स्मारकावर आदरांजली वाहण्यासाठी बस प्रवास करणाऱ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न करुन अहंकारी भाजपने भाजप सरकारच्या नाकर्तेपणाने वाटेत बंद पडणाऱ्या बसेसमूळे यातना भोगणाऱ्या गरीब प्रवाशांचा अपमान केला आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपव टीका केली आहे.

काँग्रेसने यासोबत बंद पडलेल्या कंदब बसला काहीजण धक्का देत असल्याचा व्हिडिओ देखील जोडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com