Illegal Cables On Pole Dainik Gomantak
गोवा

Illegal Cables: 'वीजखांबांवरील केबल्स धोकादायकच'! कारवाई सुरूच राहणार; पुरवठादारांची याचिका खंडपीठाने फेटाळली

Illegal Cables On Eletric Poles: बेकायदा प्रकारांना समर्थन देणे योग्य नसल्याची सरकारने मांडलेली बाजू खंडपीठाने उचलून धरत पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर ठेवली आहे.

Sameer Panditrao

Goa Bench Illegal Cables Cutting On Electric Pole

पणजी: कोणताही परवाना नसताना वीजखांबांचा वापर इंटरनेट व टीव्ही केबल्‍ससाठी करण्यात येत असल्याने वीज खात्याने त्या केबल्‍स कापण्यास सुरवात केली. या कारवाईला स्थगिती देण्याची अखिल गोवा केबल टीव्ही नेटवर्किंग आणि सेवा पुरवठादार संघटनेने मूळ याचिकेत अर्जाद्वारे केलेली विनंती आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावली. त्‍यामुळे संघटनेला मोठा दणका बसला आहे.

वीजखांबांवर टांगण्यात आलेल्या केबल्समुळे धोकादायक घटना घडतात. तसेच शहराच्‍या सौंदर्यालाही बाधा येते. अशा बेकायदा प्रकारांना समर्थन देणे योग्य नसल्याची सरकारने मांडलेली बाजू खंडपीठाने उचलून धरत पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर ठेवली आहे.

संघटना म्‍हणते, आम्‍ही शुल्‍क द्यायला तयार

दुसरीकडे संघटनेचे म्‍हणणे असे आहे की, केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार वीजखांब किंवा भूमिगत वीजवाहिन्या वापरण्याचे शुल्क देण्याची आमची तयारी आहे. मात्र येत्या ३१ जानेवारीपर्यंत शुल्क जमा न केल्यास केबल्‍स कापल्‍या जाऊ नयेत. याचिकादारांकडून परवानगीसाठी अर्ज करेपर्यंत या कारवाईला स्थगिती द्यावी. कोणतीही कल्पना न देता अचानक वीज खात्याने कारवाई सुरू केल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.

केंद्र सरकारच्‍या नवीन नियमांनुसार कारवाई

यावर्षी जानेवारीपासून केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार ही कारवाई केली जात आहे. ज्‍यांना या नियमांमध्ये शिथिलता हवी असेल, त्यांनी संबंधित अधिकारिणीकडून परवानगी घ्यावी. याचिकादार संघटना इंटरनेट व टीव्ही केबल्‍ससाठी वीजखांबांचा वापर बेकायदेशीरपणे करत आहे. त्‍यासाठी आवश्‍यक असलेला वीज खात्‍याचा परवाना त्‍यांच्‍याकडे नाही, अशी बाजू ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी न्‍यायालयात मांडली.

केबल्‍स ऑपरेटर व इंटरनेट सेवा पुरवठादारांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून वीजखांबांवर बेकायदा केबल्‍स टांगल्‍या आहेत. तसेच २०२० पासून शुल्क दिलेले नाही. त्‍यामुळे वीज खात्याचा महसूल बुडत आहे. गोवा खंडपीठाने त्यांची विनंती फेटाळल्याने कारवाई सुरूच राहील.
काशिनाथ शेट्ये, (वीज कार्यकारी अभियंता, पणजी मुख्यालय)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT