IIFA Awards 2025 Winners: नामांकित आयफा अवॉर्ड्स २०२५ मध्ये आदित्य जांभळे याने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. गोव्यातील आदित्य जांभळे याला आयफा अवॉर्ड्स २०२५ मध्ये 'आर्टिकल ३७०' या सिनेमासाठी उत्कृष्ट संवाद दिल्याबद्दल सन्मान प्राप्त झाला आहे. शिवाय नेक्सा आयफा अवॉर्ड्स २०२५ साठी उत्कृष्ट चित्रपट व उत्कृष्ट दिग्दर्शक या विभागात देखील आदित्य जांभळे याला नामांकन मिळालं होतं.
मूळ कुर्टी, फोंडा गोवा येथील आदित्य जांभळे याला यापूर्वी त्याने दिग्दर्शित केलेल्या दोन लघुपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रविवार (दि.९ मार्च) रोजी जयपूर येथे बॉलीवूडमधला सर्वात महत्वाचा आणि मनाचा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक सिनेकलाकार उपस्थित होते तसेच कित्येकांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरवण्यात आलं.
या सोहळयात किरण राव यांच्या लापता लेडीज या चित्रपटाने एकूण १० पुरस्कार मिळवत आयफा अवॉर्ड्स २०२५ मधील सर्वोत्तम सिनेमाचा किताब मिळवलाय. दरम्यान कार्तिक आर्यनला देखील भूल भुलैय्या-३ साठी सन्मानित करण्यात आलं.
काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत आदित्य जांभळे याने २०१८ पासून त्याच्या करियरमध्ये इंडियन पॅनोरमाची सुरवात ‘खरवस’ लघुचित्रपटाने झाली असल्याचं सांगितलं होतं आणि त्या घटनेने त्याचं संपूर्ण जीवन बदलून गेल्याचंही तो म्हणाला होता. गोवा म्हणजे केवळ समुद्रकिनारे, निसर्ग आणि मौजमजा एवढ्यापुरता मर्यादित नाही तर त्या पलीकडे देखील गोवा आहे, जो या जगाला माहित नाही. तो गोवा जगाला दाखवायचं माझं स्वप्न" असल्याचं जांभळे याने सांगितलं होतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.