Article 370 Teaser: कलम 370 कसं हटवलं? गोव्याचा आदित्य जांभळे सिनेमातून उलघडतोय प्रवास, पाहा पहिली झलक

आर्टीकल 370 चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Article 370 Teaser
Article 370 TeaserDainik Gomantak
Published on
Updated on

Article 370 Teaser: जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भाजप सरकारने 6 ऑगस्ट 2019 रोजी हटवले. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरला राज्य तर लडाखला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.

देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक महत्व असलेल्या या निर्णय व एकंदर घडामोडीचा प्रवास सिनेमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शन गोव्याचे आदित्य जांभळे यांनी केले आहे.

आर्टीकल 370 (Article 370) या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, यात बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री यामी गौतमी मुख्य भूमिकेत दिसत आहे.

जिओ आणि B62 स्टुडीओच्या वतीने हा सिनेमा प्रस्तुत केला असून, ज्योती देशपांडे तसेच, आदित्य आणि लोकेश धर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Article 370 Teaser
Goa: गोव्याच्या प्रतिमेला धक्का, 'त्या' आक्षेपार्ह वेबसाईट्सवर बंदी घालण्याची मागणी

आर्टीकल 370 चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यामी शिवाय प्रिया मणी, अरुण गोविल, वैभव तत्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार, इरावती हर्षे मायादेव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

गोव्याचे आदित्य सुहास जांभळे दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बीई पूर्ण केल्यानंतर त्यांनी 'श्री महालसा प्रॉडक्शन' आणि 'लोगोक्राझ' या ग्राफिक डिझाइन कंपनीची स्थापना केली.

"आबा ऐकताय ना?" या लघुपटासाठी 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2016 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी (गोल्डन लोटस) राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. आदित्य गेल्या 10 वर्षांपासून मराठी नाट्यक्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी नटसम्राट, आरे मनसा मनसा, फायनल व्हर्डिक्ट आदी नाटकांसाठी राज्य पुरस्कार जिंकले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com