IFFI 2025 Dainik Gomantak
गोवा

IFFI 2025: सिनेरसिकांसाठी 'इफ्फी'चा मेजवानी मोसम सुरू, पत्रकारांसाठी 'चित्रपट रसग्रहण' अभ्यासक्रम; 'FTII'चे आयोजन

Goa IIFFI: गोव्‍यात येत्‍या २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ५६व्या आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) उलटी गणती सुरू झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्‍यात येत्‍या २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ५६व्या आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) उलटी गणती सुरू झाली आहे. या सोहळ्याआधीच चित्रपट रसिक आणि माध्यम प्रतिनिधींसाठी एक खास पर्व सुरू होणार आहे. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतर्फे (एफटीआयआय) १८ नोव्हेंबर रोजी ‘चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रम’ आयोजित करण्यात आला आहे.

चित्रपट पाहण्याची नजर अधिक धारदार व्हावी, दृश्यभाषा आणि प्रतिकांमधील अर्थ समजावा, यासाठी दरवर्षी एफटीआयआय अशा कार्यशाळांचे आयोजन करत असते. यंदा मात्र हा अभ्यासक्रम अधिक चर्चेत आहे. कारण या सत्रात फक्त अधिस्वीकृतीप्राप्त माध्यम प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी अशा अभ्यासक्रमात सहभागी होऊ न शकलेल्या पत्रकारांना यंदा प्राधान्य देण्यात येणार असल्याने माध्यम क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, ‘इफ्फी’चे आकर्षण यंदाही शिगेला पोहोचले आहे. देश-विदेशातील दिग्दर्शक, कलाकार, समीक्षक आणि सुमारे ५० हजार प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. जागतिक दर्जाच्या चित्रपटांचा आनंद ते घेतील.

नावनोंदणी ५ नोव्हेंबरपर्यंत

अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक पत्रकारांनी येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx या अधिकृत पोर्टलवर नावनोंदणी करावी लागेल. प्रतिनिधींना वैध ओळखपत्रासह आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. पात्रतेचे निकष आणि दस्तऐवजासंबंधी सर्व माहितीही या पोर्टलवर उपलब्ध आहे, अशी माहिती ‘एफटीआयआय’ने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात देण्यात आली आहे.

चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रम

दिनांक : १८ नोव्हेंबर २०२५. आयोजक : भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, पुणे. सहभागी : अधिस्वीकृतीप्राप्त माध्यम प्रतिनिधी. प्राधान्य : यापूर्वी सहभागी न झालेले पत्रकार. नोंदणी : ५ नोव्हेंबरपर्यंत PIB पोर्टलवर. दरम्‍यान, ‘इफ्फी’चे आकर्षण यंदाही शिगेला पोहोचले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Bicholim: डिचोलीत दिवसाढवळ्या इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

Goa Live Updates: डिचोलीत इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

अग्रलेख: बस स्टॉपवरील 'राडा' आणि मानवता, एका फौजीच्या वेशातील देवदूताची कथा

SCROLL FOR NEXT