Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

majhe ghar scheme goa: राज्य सरकारने गोमंतकीयांच्या हितार्थ राबविलेल्या अनोख्या ‘माझे घर’ योजनेला खो घालण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी : राज्य सरकारने गोमंतकीयांच्या हितार्थ राबविलेल्या अनोख्या ‘माझे घर’ योजनेला खो घालण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. विधानसभेत ‘माझे घर’ योजनेला परवानगी मिळाल्यावरही ‘माझे घर’ला विरोधी पक्ष विरोध करताहेत, असा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

गरीब जनतेला स्वतःच्या घराचे हक्क मिळण्यापासून रोखण्याचे पाप विरोधकांनी केले असून त्यांना योग्य तो धडा जनतेने त्या विरोधी आमदारांना व विरोधी पक्षांना शिकवावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी कुंकळ्ळी व केपे मतदारसंघात या योजनेची माहिती देण्यासाठी व अर्ज वितरणासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

राज्यातील अनेक घरांना काही कायदेशीर व तांत्रिक किचकटीमुळे घराचे कायदेशीर हक्क मिळू शकले नाहीत, ते सर्व हक्क आता या ‘माझे घर’अंतर्गत मिळणार आहेत. योग्य त्या कायदेशीर बाबी पूर्ण न करता ज्यांनी घरे उभारली व जे या घरात गेल्या अनेक वर्षांपासून राहताहेत त्यांच्यावर घर मोडण्याची टांगती तलवार होती, त भीती ‘माझे घर’मुळे संपुष्टात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्थानिक कोमुनिदाद संस्थांनी या योजनेचा फायदा घेणाऱ्यांना घर कायदेशीर करण्यासाठी आवश्यक ‘ना हरकत दाखला’ द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलताना केले.

केपे मतदार संघासाठी अर्ज वितरण कार्यक्रम श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थान सभागृहात झाला. कुंकळ्ळी मतदार संघासाठी अर्ज वितरण कार्यक्रम नगरपालिका सभागृहात झाला.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, कुंकळ्ळीचे माजी आमदार, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, गट विकास अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचे अर्ज वितरित करण्यात आले.

CM Pramod Sawant
Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

हक्क दिलेल्यांना विसरू नका!

घराचे हक्क देण्याची योजना अस्तित्वात आणून घराची मालकी हक्क देणाऱ्या सरकारातील लोक प्रतिनिधींना लोकांनी विसरू नये. ज्यांनी या योजनेला विरोध केला त्यांना निवडणुकीच्या वेळी धडा शिकवावा, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

‘सोसेदाद’ जमिनीलाही योजना लागू !

‘माझे घर’ ही केवळ सरकारी व कोमुनिदाद जागेवर उभारलेल्या घरांनाच नव्हे तर कुंकळ्ळीतील ‘सोसेदाद दि आग्रिकोला कुंकोलिम इ वेरोडा’ या संस्थेच्या जागेवर उभारलेल्या घरांनाही लागू होणार आहे. संस्थेने या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्यांना ‘ना हरकत’ दाखला द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली

CM Pramod Sawant
Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

स्थानिक स्वराज संस्थांतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी , नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी ही योजना यशस्वी करण्यासाठी झटावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. कोमुनिदाद संस्थाकडून ‘ना हरकत’ दाखला घेण्यासाठी स्थानिक नेत्यांनी त्या संस्था चालकांना विनंती करावी,असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com