Online Ticket Booking at IFFI Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2024: आता तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही, असं करा बुकिंग आणि चित्रपटांचा आनंद घ्या

Online Ticket Booking at IFFI: प्रेक्षकांना तिकीट बुक केल्यानंतर ताबडतोब ई-मेलद्वारे ई-तिकीट पाठवलं जाईल

Akshata Chhatre

Iffi Goa 2024 Online Registration

पणजी: इफ्फीच्या आयोजकांकडून विविध भागांमधून येणाऱ्या डेलिगेट्ससाठी एक खास आणि मोठी घोषणा करण्यात आलीये. तुम्हाला जर का एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता. आयोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार प्रेक्षक इफ्फीच्या वेबसाईटवरून किंवा मोबाईल ऍपवरून चित्रपटांचं बुकिंग करू शकतील, मात्र यासाठी तुम्हाला किमान एक दिवस आधी बुकिंग करणं अनिवार्य असणार आहे.

प्रेक्षकांना तिकीट बुक केल्यानंतर ताबडतोब ई-मेलद्वारे ई-तिकीट पाठवलं जाईल, मात्र तिकीट बुक करून जर का तुम्ही चित्रपटाच्या प्रदर्शन गेला नाही तर मात्र पुन्हा तेच कार्ड वापरून तुम्हाला नवीन चित्रपटाचं बुकिंग करता येणार नाही.

इफ्फीकडून डेलिगेट्सना तीन भागांमध्ये विभागण्यात आलंय आणि तुम्ही ज्या विभागात आहात त्यानुसार तुम्हाला ठराविक चित्रपटांचे बुकिंग करता येईल. जर का तुम्ही प्रोफेशनल डेलिगेटच्या विभागात असाल तर प्रत्येक दिवसाला पाच तिकिटं बुक करू शकता मात्र विद्यार्थी किंवा चित्रपटप्रेमींच्या विभागात असाल तर केवळ चार तिकिटं बुक करता येणार आहेत.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला जर का तिकीट रद्द करायचं असेल तर ही प्रक्रिया चित्रपट सुरू होण्याच्या किमान 30 मिनिटं आधी केली पाहिजे. तसेच चित्रपट सुरु होण्याच्या काही काळ आधी राखीव जागा खुल्या केल्या जातील आणि यानंतर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता.

प्रेक्षक एकाचवेळी दोन वेगवेगळ्या चित्रपटांचं बुकिंग करू शकणार नाही, दोन चित्रपटांमध्ये किमान तासाभराचं अंतर असणं गरजेचं आहे चित्रपट प्रदर्शनच्यावेळी थिएटरच्या पायऱ्यांवर बसण्यावर सख्त मनाई आहे, असे प्रकार आढळल्यास पुन्हा चित्रपटाच्या प्रदर्शनास उपस्थिती लावणायची संधी मिळणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: पिळगावचे शेतकरी एकवटले, वेदान्ता खाणीचा रस्ता अडवला; रस्त्यात उभारली झोपडी

IFFI Goa 2024: यंदाच्या इफ्फीत खास कार्यक्रमाचे आयोजन; 'इफ्फीएस्टा' करणार उपस्थितांचे मनरिजवण

Bhoma Flyover: गडकरीजी, देवी सातेरी आणि तिच्या भावाची ताटातूट थांबवा; गोव्यातल्या ग्रामस्थांची आर्त हाक

दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत, धमाकेदार सादरीकरणाने झाले इफ्फीचे ग्रँड उद्घाटन; गोव्यातील ठळक बातम्या

Mumbai: गोव्यातून चक्क मृत व्यक्ती आला मुंबईत मतदानाचा हक्क बजावायला, पुढं काय घंडलं? वाचा मतदान केंद्रावरील ड्रामा

SCROLL FOR NEXT