IFFI 2023 Goa  Dainik Gomantak
गोवा

IFFI 2023: काय असतो 'इफ्फी'तील 'फिल्म बाजार'? जाणून घ्या त्यातील विविध दालने, इफ्फी सिनेमेळाविषयी...

दिग्दर्शक, निर्माते, विक्री एजंट, फेस्टिव्हल प्रोग्रामर, अर्थ पुरवठादारांना लाभदायी व्यासपीठ

Akshay Nirmale

IFFI Goa 2023 Film Bazaar : गोव्यात ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) ला सुरवात होत आहे. इफ्फी हा जागतिक चित्रपटांचा महोत्सव असतो.

या महोत्सवासोबतच या परिसरात आयोजक एनएफडीसी यांच्याद्वारे “बिझनेस ऑफ सिनेमा” हा चित्रपट बाजार आयोजित केला जातो. काय असतो हा फिल्म बाजार जाणून घेऊया...

इफ्फीचा फिल्म बाजार दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या जागतिक चित्रपट बाजारांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे.

हा मंच आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, विक्री एजंट किंवा फेस्टिव्हल प्रोग्रामर यांच्यासाठी संभाव्य सर्जनशील आणि आर्थिक सहकार्यासाठी एक परिपूर्ण व्यवस्था म्हणून काम करतो. एकप्रकारे या सर्वांसाठी फिल्म बाजार हे एक उत्तम व्यासपीठ ठरते.

चित्रपट बाजारातील दालने आणि स्टॉल्स

व्हीएफएक्स आणि तंत्रज्ञान दालन-

नवीन तयार केलेले “व्हीएफएक्स आणि तंत्रज्ञान दालन” चित्रपट बाजारमध्ये एकीकृत करण्यात आले असून ते समुद्रासमोरील विहार मार्गिकेवर ठेवले असेल. हे चित्रपट निर्मात्यांना केवळ "शॉट घेण्याच्या" पारंपरिक मार्गानेच नव्हे तर अनंत शक्यतांसह शॉट तयार करणे, या द्वारे कथा सांगण्याच्या शक्यतांचा शोध घेत अलीकडील नवोन्मेषाची जाणीव करून देईल.

आंतरराष्ट्रीय चित्रपट आयोग आणि भारतीय राज्यांचे अनेक स्टॉल त्यांच्या स्थानांचा आणि प्रोत्साहन योजनांच्या प्रचारासाठी असतील. चित्रपटाशी संबंधित निर्मिती केंद्र, संस्था, संघटना इत्यादींचे अनेक स्टॉल्स उपलब्ध असतील.

माहितीपट आणि कथाबाह्य कलाकृती /चित्रपट यांचा परिचय

निवडक चित्रपट दिग्दर्शक, देश आणि राज्यांकडून चर्चा सत्रे, चित्रपट निर्मिती आणि वितरणाच्या महत्त्वाच्या पैलूंचा समावेश असलेली "नॉलेज सिरीज" तयार करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी सुरू झालेल्या, ‘बुक टू बॉक्स ऑफिस’ विभागाने ‘द स्टोरी इंक’ सोबत भागीदारी केली आहे, सर्जनशील लेखकांना त्यांचे काम सादर करण्यासाठी या कथांची ओळख निर्माते आणि व्यासपीठ प्रमुखांना करून देण्यासाठी मंच प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे. एकूणच, 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रकल्प या वर्षी निर्मिती, वितरण किंवा विक्रीसाठी चित्रपट बाजारच्या 17 व्या आवृत्तीत तयार केले जातील आणि प्रदर्शित केले जातील.

उद्याचे 75 सर्जनशील कलाकार (सीएमओटी)

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर, यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा उद्देश चित्रपट निर्मितीच्या विविध व्यवसायातील तरुण सर्जनशील प्रतिभा ओळखणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संवर्धन करणे हा आहे.

शॉर्ट्स टीव्ही हा संकल्पनात्मक प्रोग्रामिंग भागीदार आहे, जो टीव्हीवर, मोबाइलवर, ऑनलाइन आणि चित्रपटगृहामध्ये उपलब्ध असलेल्या उच्च-दर्जाच्या लघुपट आणि मालिकांची जगातील सर्वात मोठी सूची असलेलेआ संच आहे. या निवडक ‘सर्जनशील कलाकारांची’ची ‘फिल्म चॅलेंज’साठी 5 चमूमध्ये विभागणी करण्यात आली आहे, प्रत्येकी एक लघुपट 48 तासांत बनवला जाईल.

या वर्षी उमेदवारांचे व्यावसायिक वर्ग देखील असतील, विशेषत: सिनेमाच्या तज्ज्ञांद्वारे यात मार्गदर्शन केले जाईल. आणि 20 पेक्षा जास्त आघाडीच्या कंपन्यांसह भर्तीसाठी "टॅलेंट कॅम्प" आयोजित केले जाईल.

इफ्फी सिनेमेळा

इफ्फी हा केवळ सिनेमॅटिक उत्कृष्टतेचे प्रदर्शन नाही तर सांस्कृतिक विविधतेचा उत्सव देखील आहे. या वर्षी, इफ्फी सिनेमेळा हा सिनेसृष्टीमध्ये एक नेत्रदीपक भर घालणारा असेल.

यात इफ्फीमध्ये उपस्थित आणि इतर लोक म्हणजेच स्थानिक आणि पर्यटक जे इफ्फीसाठी नोंदणीकृत नाहीत, ते देखील सिनेमा, कला, संस्कृती, कलाकुसर, खाद्यपदार्थ इत्यादींच्या जादूचा उत्सव साजरा करताना उत्साहवर्धक उपक्रमांचा आनंद घेऊ शकतात.

इतर आकर्षणे

ओपन एअर स्क्रिनिंग, कारवाँ, शिगमोत्सव, गोवा कार्निव्हल, सेल्फी पॉइंट्स, इफ्फी मर्चंडाईज इत्यादी देखील इफ्फीचे आकर्षण असणार आहे.

दरम्यान, महोत्सवाच्या ठिकाणांचे ब्रँडिंग आणि सजावटीसाठी एनएफडीसी आणि ईएसजीने अहमदाबादच्या एनआयडीसोबत भागीदारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Goa Assmbly Live: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा; आमदार निलेश काब्राल यांची मागणी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

Mohammed Siraj: मिया भाईची 'मायसेल्फ' स्टोरी...! ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद सिराजची प्रतिक्रिया; 'त्या' आठवणीने झाला भावूक VIDEO

SCROLL FOR NEXT