54th International Film Festival of India 2023
54th International Film Festival of India 2023Dainik Gomantak

IFFI Goa 2023: गोव्यात 'इफ्फी'मध्ये होणार 13 वर्ल्ड प्रीमियर्स, 18 इंटरनॅशनल प्रीमियर्स; जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

सोमवारपासून प्रारंभ; महोत्सवात 62 आशिया प्रीमियर्स, 89 इंडिया प्रीमियर्स होणार
Published on

IFFI Goa 2023: गोव्यामध्ये 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (IFFI) सोमवार 20 नोव्हेंबरपासून सुरवात होत आहे. या महोत्सवात 13 वर्ल्ड प्रीमियर्स, 18 इंटरनॅशनल प्रीमियर्स, 62 आशिया प्रीमियर्स, 89 इंडिया प्रीमियर्स होणार आहेत.

दरम्यान, गोव्याची राजधानी पणजीतील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये इफ्फीचा उद्घाटन सोहळा होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल.

महोत्सवाची सुरुवात 'कॅचिंग डस्‍ट' या ब्रिटीश चित्रपटाने होईल. गुन्हेगार पतीला सोडू पाहणाऱ्या पत्नीची कहाणी या चित्रपटात मांडली आहे.

यंदाच्या महोत्सवात विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतील 19 पुरस्कार विजेते चित्रपट इफ्फी कॅलिडोस्कोपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

'आंतरराष्ट्रीय विभागात' 198 चित्रपट असतील आणि महोत्सवात 13 वर्ल्ड प्रीमियर्स, 18 इंटरनॅशनल प्रीमियर्स, 62 आशिया प्रीमियर्स आणि 89 इंडिया प्रीमियर असतील.

'इंडियन पॅनोरमा' विभागात भारतातील 25 फीचर फिल्म आणि 20 नॉन-फीचर फिल्म्स दाखवल्या जातील- फीचर सिलेक्शनमधील सुरुवातीचे चित्रपट आणि नॉन फीचर सिलेक्शन मल्याळम चित्रपट 'अट्टम' आणि मणिपुरी भाषेतील चित्रपट 'अँड्रो ड्रीम्स' असतील.

54th International Film Festival of India 2023
Navy Kochi To Goa Race: समुद्रात रंगणार कोची ते गोवा रेसचा थरार; 5 दिवसांत कापणार 667 किमी अंतर

ज्युरी

प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर 54 व्या इफ्फीसाठी ज्युरी प्रमुख असतील. दरम्यान, पाच सदस्यीय ज्युरी पॅनलमध्ये स्पॅनिश सिनेमॅटोग्राफर जोस लुइस अल्केन आणि निर्माते जेरोम पेलार्ड, कॅथरीन दुसार्ट आणि हेलन लीक यांचा समावेश असेल.

चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी IFFI मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT) - पुरस्कार सोहळ्यातील नवीन श्रेणी - साठी पाच सदस्यीय ज्यूरीचे प्रमुख म्हणून काम करतील.

मायकल डग्लस यांना जीवनगौरव

या व्यतिरिक्त, यावर्षी हॉलिवूड अभिनेता आणि निर्माता, मायकेल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच्या नावावर 2 ऑस्कर, 5 गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि इतर असंख्य सन्मान आहेत.

54th International Film Festival of India 2023
Konkan Railway: गोव्यात करा ख्रिसमस, न्यू ईयरचे सेलिब्रेशन; कोकण रेल्वेतर्फे धावणार विशेष रेल्वेगाड्या

उद्घाटन आणि समारोप

स्टार्सने जडलेल्या उद्घाटन समारंभात शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, नुसरत भरुचा आणि इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या परफॉर्मन्सचे साक्षीदार देखील असतील.

हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्ससह ए. आर. रेहमान, विद्या बालन, करण जोहर आणि सारा अली खान देखील 9 दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.

28 नोव्हेंबर रोजी होणार्‍या समारोप समारंभात आयुष्मान खुराना आणि संगीतकार अमित त्रिवेदी यांचे सादरीकरण होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com