IFFI 2023 : Boman Irani | Docu Film - 1947 : Brexit India
IFFI 2023 : Boman Irani | Docu Film - 1947 : Brexit India Dainik Gomantak

IFFI 2023: बोमण इराणींची डॉक्यु-फिल्म '1947: ब्रेक्झिट इंडिया'चा 'इफ्फी'मध्ये होणार प्रीमियर

फिल्ममध्ये डॉ शशी थरूर, विल्यम डॅलरीम्पल आणि डॉ. इश्तियाक अहमद यात दिसणार आहेत

IFFI Goa 2023: गोव्यातील प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 2023 मध्ये बोमन इराणी यांच्या 1947: ब्रेक्झिट इंडिया या डॉक्यु फिल्मचा प्रीमियर होणार आहे.

भारत-अमेरिका यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या डॉक्युमेंटरीची अधिकृत निवड करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेता बोमन इराणी हे अँकर आहेत. त्यांच्या निवेदनातून ही डॉक्युमेंटरी उलगडते. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले.

तेव्हा ब्रिटनच्या भारतातून बाहेर पडण्याच्या आसपासच्या घटनांचा एक आकर्षक शोध या फिल्ममधून घेतला गेला आहे.

1947: ब्रेक्झिट इंडिया ही एक महत्वाची घटना होती. त्यामुळे 20 व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण भू-राजकीय बदल घडले. अनपेक्षितपणे ब्रिटनने घाईघाईने आणि अचानक माघार घेत भारताच्या स्वातंत्र्याला सुमारे वर्षभराने गती कशी दिली याचे रहस्य आर्थिक दृष्टिकोनातून या माहितीपटात उलगडले आहे.

IFFI 2023 : Boman Irani | Docu Film - 1947 : Brexit India
Prayagraj-Goa Flight: प्रयागराज ते गोवा थेट विमानसेवा सुरू होणार? विमान कंपन्या करणार सर्व्हे

या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक क्षणाच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकणे आणि त्यानंतरच्या गंभीर परिणामांवर प्रकाश टाकणे हा चित्रपटाचा उद्देश आहे. लंडन, वेल्स, हल, दिल्ली, चंदीगड, अमृतसर, मुर्शिदाबाद, प्लासी, बक्सर आणि मुंबई येथे याचे चित्रीकरण झाले आहे.

बोमन इराणी म्हणाले, “कथनकार म्हणून, आजच्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी मी ही ऐतिहासिक कथा सादर करण्याचे आव्हान स्वीकारले.

ही केवळ घटनांची मोजणी नाही; हा मानवी शोकांतिकेचा शोध आहे, आपल्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. अनेकांना अपरिचित भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रवासावर एक कालातीत दृष्टीकोन देणारी ही फिल्म आहे.”

IFFI 2023 : Boman Irani | Docu Film - 1947 : Brexit India
Nilesh Cabral: विजय सरदेसाईंनी क्लीन चिट देणे हे माझ्यासाठी सर्टिफिकेट; पाठिशी राहिल्याबद्दल त्यांचे आभार

याचे दिग्दर्शक संजीवन लाल आहेत. प्रकल्पाची खोली, प्रासंगिकता पाहून वेगवान कथन ठेवल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या फिल्ममध्ये डॉ शशी थरूर, विल्यम डॅलरिम्पल, डॉ. इश्तियाक अहमद, कमोडोर उदय भास्कर, प्रा. एम. राजीवलोचन, डॉ. अ‍ॅलिस्टर हिंड्स, प्रा. टॉम टॉमलिन्सन, डॉ. डेव्हिड ओमिसी आणि डॉ. गुरहरपाल सिंग यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com