Actor Ranjeet at IFFI 2023
Actor Ranjeet at IFFI 2023  Instagram
गोवा

IFFI 2023: मी मुलीसोबत आलोय, कॉलगर्ल सोबत नाही; 'इफ्फी'मध्ये अभिनेते रणजीत यांनी सांगितला किस्सा...

Akshay Nirmale

Actor Ranjeet in IFFI 2023: अजय देवगण एवढा मोठा अॅक्टर आहे, त्याला काय गरज आहे रमीची जाहिरात करायची? असा उद्विग्न सवाल जुन्या काळातील हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी केला.

गोव्यात सुरू असलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोमवारी, 27 नोव्हेंबर रोजी कला अकादमीत झालेल्या इन कॉन्व्हर्सेशन सत्रात ते बोलत होते.

या कार्यक्रमात चित्रपटांत खलनायकांच्या भूमिका साकारलेले रणजीत, रझा मुराद, किरण कुमार, गुलशन ग्रोव्हर हे सहभागी झाले होते. चित्रपट उद्योग विश्लेषक कोमल नाहटा यांनी या सर्वांशी दिलखुलास संवाद साधला.

अभिनेते रणजीत म्हणाले की, मी अलीकडच्या काळात अनेक फिल्म्स, वेबसीरीज नाकारल्या. मी एकही वेबसीरीज केलेली नाही. कारण त्यातील भाषा ही घरातल्यांसमोर बोलली जाणारी नाही. मी डायलॉग न बोलता ते एक्सप्रेशन देऊ शकतो. शिवी कशाला पाहिजे. आजकाल सगळं शिव्यांवरून सुरू होते. आजची जी भाषा आहे ती जाणीवपूर्वक बनवली जात आहे.

मी पाच वर्षांपासून टीव्हीच बघत नाही. अजय देवगण एवढा मोठा अॅक्टर आहे, त्याला काय गरज आहे रमीची जाहिरात करायची? तो कशाला सांगतो रमी खेळा, पैसे मिळतील म्हणून. मलाही आली होती ऑफर, मी नाकारली. फॅन्स जेव्हा पाहतात तेव्हा ते कॉपी करतात.

ते म्हणाले, मी व्हिलन साकारला. खूप क्रूर व्हिलन साकारला. पण मी व्हल्गर व्हिलन नव्हतो. लोकांनी कधी मला व्हल्गर मानले जाते. माझे सर्वांशी चांगेल संबंध होते. फिल्म इंडस्ट्रीसह सर्वत्र. माझी भूमिका व्हिलनची आहे म्हणजे रणजीत तसा नाही. हीरोईन्सची साडी ओढून मी थकलो.

नंतर तशा भूमिकांना मी कंटाळलो. आता व्हल्गॅरिटी वाढली आहे. आता खासदारच संसदेत मुस्लीम सहकाऱ्याला वाईट बोलतात. प्रेक्षकांचे मनोरंजन तुम्ही कशाच्या आधारावर देताय, न्युडिटी, शिव्या, व्हल्गॅरिटी यावर असेल तर मला असे काही करायचे नाही.

ते म्हणाले, माझी मुलगी दिल्लीत शिकायची. मी तिला शनिवार-रविवारी भेटायला जायचो. कारण लोकांना कळावे ती माझी मुलगी आहे. (मिष्किलपणे) ती मला बाहेर जेवायला न्यायची.

आता ती माझी मुलगी आहे म्हटल्यावर ती माझ्या जवळ असायची. पण बघणाऱ्याला वाटायचे की म्हातारा झाला तरी तरण्या पोरींसोबत फिरतो याला लाज वाटत नाही, वगैरे. तर रेस्टॉरंटमध्ये इतर लोक त्यांच्या बायका-मुलींना मी बसलेल्या टेबलकडे बघू द्यायचे नाहीत.

पण त्यामुळे मी कधी अनकम्फर्टेबल झालो नाही. कारण मला माहिती होतं की माझ्या भूमिकांचा तो प्रभाव होता.

मग मी काय करायचो. जेव्हा वेटर ऑर्डरसाठी यायचा तेव्हा मी मोठ्या आवाजात म्हणायचो, अरे मुलीसोबत आलोय, तिला जे खाऊ घालायचे आहे ते ती सांगेल. मी हे जाणीवपूर्वक सांगायचो कारण मला सांगायचे असायचे की ही माझी मुलगी आहे, आणि मी कॉल गर्लसोबत आलेलो नाही.

मग माझं ते वाक्य ऐकून मघाशी रेस्टॉरंटमधील जे ग्राहक त्यांच्या मुली-बायकांना माझ्या टेबलकडे बघू द्यायचे नाहीत तेच येऊन गप्पा मारायचे. मग मी त्यांना सांगायचो, मघाशी तुम्ही जे तुमच्या कुटूंबियांना सांगत होतात ते सर्व मी ऐकले आहे.

एअरहोस्टेस ओरडली...

त्या काळात मी इतका बिझी होतो की दोन विमाने बदलण्याच्या मधल्या काळातही मला शॉट द्यावा लागला होता. डायरेक्टरने टॅक्सीमध्ये येऊन माझा क्लोजअप घेतला होता. एकदा तर मी सेटवरून तसाच विमानतळावर आलो होतो.

आणि माझ्या अंगावरील कपडे रक्ताने माखल्यासारखे होते. मी विमानात शिरलो आणि एअरहोस्टेस घाबरून ओरडली.

त्यावर कोमल नाहटा यांनी हा 'ब्लडी जॉब' असल्याची कोटी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT