IFFI 2023: सनी देओलच्या 'या' चित्रपटानंतर दोन फोन कॉल आले... एक अंडरवर्ल्डमधून आणि दुसरा 'मातोश्री'वरून...

'इफ्फी'त रंगला संवाद; दिग्दर्शक राजकुमार संतोषी सनीसोबत करणार 'लाहोर 1947'
IFFI 2023 : Sunny Deol | Rahul Rawail | Rajkumar Santoshi | Anil Sharma
IFFI 2023 : Sunny Deol | Rahul Rawail | Rajkumar Santoshi | Anil Sharma Dainik Gomantak

IFFI 2023: अभिनेता सनी देओल याच्या एका चित्रपटामुळे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल यांना दोन फोन कॉल आले होते. त्यातील एक कॉल आला होता अंडरवर्ल्डमधून तर दुसरा फोन कॉल होता थेट 'मातोश्री'वरून.

गोव्यात सुरू असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इन कॉन्व्हर्सेशन या संवाद सत्रात ही माहिती समोर आली.

कला अकादमी येथे रंगलेल्या या कार्यक्रमात सनीसोबत काम केलेले राहुल रवैल, राजकुमार संतोषी आणि अनिल शर्मा हे दिग्दर्शक सहभागी झाले होते. या चौघांच्या संवादातून सनीच्या फिल्मी कारकिर्दीचा कॅनव्हाज प्रेक्षकांसमोर उलगडला गेला.

सनीच्या 'अर्जून' या चित्रपटाविषयी बोलताना त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल म्हणाले की, या चित्रपटातील बरेचशा दृश्यांवर अंडरवर्ल्डमधील घटनांचा प्रभाव होता. आणि ही माहिती उघड झाली होती. त्यामुळे या चित्रपटानंतर दोन फोन कॉल मला आले होते.

त्यातील एक फोन कॉल होता अंडरवर्ल्डमधून. त्यावेळी जावेद अख्तरनादेखील चिंता वाटत होती. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो त्यांना आवडला. त्यानंतर 'डोंगरी'तून मला थेट डिनरसाठी बोलावणे आले होते. मला सन्मान करण्यासाठी तिथे बोलावले होते. पण, मी दिल्लीला जाणार असल्याचे सांगून तिकडे जाणे टाळले.

IFFI 2023 : Sunny Deol | Rahul Rawail | Rajkumar Santoshi | Anil Sharma
IFFI 2023: करन जोहर पहिल्या रांगेत कसा?; 'इफ्फी'चा बॉलीवूड तमाशा करून टाकला...; आयोजकांवर ज्युरी भडकले

दुसऱ्या फोन कॉलवरील पहिला शब्द होता 'जय महाराष्ट्र.' हा फोन कॉल आला होता थेट 'मातोश्री'वरून. बाळासाहेब ठाकरेंचा. या चित्रपटातील सनीच्या कॅरेक्टरचे नाव होते अर्जून मालवणकर.

बाळासाहेब मला म्हणाले की, राहुल मी तुझी फिल्म पाहिली. तुझ्या चित्रपटातील नायक मराठी आहे. मी सभेला चाललो आहे. तु माझ्यासोबत चल. मी तिथे सांगेन की प्रत्येक शिवसैनिकाने अर्जून मालवणकरसारखे बनावे, अशी आठवण रवैल यांनी सांगितले.

'लाहोर 1947' ची उत्सुकता

याच कार्यक्रमात सनी देओलसोबत 'लाहोर 1947' हा आगामी चित्रपट करत असल्याचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी सांगितले. या जोडीने यापुर्वी घायल, दामिनी, घातक असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

सनीची प्रतिभा बॉलीवूडला समजलीच नाही - राजकुमार संतोषी 

सनी देओलमध्ये प्रचंड प्रतिभा आहे. तो सर्व प्रकारच्या भावना खूप सहज व्यक्त करू शकतो. पण इंडस्ट्रीला त्याची प्रतिभा समजली नाही, अशी भावना राजकुमार संतोषी यांनी व्यक्त केली.

IFFI 2023 : Sunny Deol | Rahul Rawail | Rajkumar Santoshi | Anil Sharma
IFFI 2023: 'इफ्फी'त आज, बुधवारी विजय सेतुपती, के. के. मेनन, बाबिल खान, मधूर भांडारकर, आर. माधवन साधणार संवाद

लवकरच येणार 'गदर 3'

दरम्यान, दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीही 'गदर 3' चित्रपट करणार असल्याचे यावेळी सांगितले. हा सिनेमा 1 हजार कोटीहून अधिक अधिक गल्ला जमवेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 

कथा ऐकून मी विकला जातो - सनी देओल 

यावेळी बोलताना सनी म्हणाला की, एखादी गोष्ट मनाला पटली तरच मी ती करतो. सिनेमांच्या बाबतीतही तेच आहे. आधी मी सिनेमाची कथा ऐकतो आणि जर ती आवडली तर मी आपोआपच त्या कथेसाठी विकला जातो.

मला स्टार व्हायचे नव्हते तर अभिनेता व्हायचे होते. म्हणूनच मी अगदी निवडक सिनेमे केले. प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेम केले म्हणूनच ही कारकीर्द खुप सुंदर झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com