IFFI 2021 : अखेर इफ्फी’तील ‘गोवा विभागा’ची घोषणा Dainik Gomantak
गोवा

...अखेर इफ्फी’तील ‘गोवा विभागा’ची घोषणा

15 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील प्रवेशिका

दैनिक गोमन्तक

पणजी: भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवातील (International Film Festival of India) म्हणजेच ‘इफ्फी’ (IFFI 2021) तील गोवा (Goa) विभागाची अधिकृत घोषणा गोवा मनोरंजन सोसायटीच्यावतीने (Entertainment Society) करण्यात आली. इफ्फी अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाही अद्याप या विभागाबद्दल काहीच हालचाल दिसत नव्हती. ‘गोमन्तक’ ने या विषयाचा पाठपुरावा केल्यानंतर इएसजीच्यावतीने या विभागाची घोषणा करण्यात आली.

20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान पणजीमध्ये होणाऱ्या या 52 व्या इफ्फीमध्ये यावर्षी गोमंतकीय सिनेमांच्या प्रतिनिधित्वावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उभारले होते. कारण या सिनेमांना सामावून घेणाऱ्या या ‘गोवा विभागा’ची घोषणाच करण्यात आलेली नव्हती. त्यातच काल जाहीर झालेल्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागातदेखील एकाही गोमंतकीय सिनेमाची किंवा लघुपटाची निवड न झाल्यामुळे गोमंतकीय सिनेकर्मी यावर्षी इफ्फीमध्ये सक्रीयरित्या सहभागी होतील की नाही याबद्दल साशंकता होती. त्यामुळे राज्यातील सगळेच सिनेकर्मीं ‘गोवा विभागा’ वर लक्ष ठेवून होते. पण महोत्सव 15 दिवसांवर आला तरी या विभागाची घोषणाच करण्यात आली नव्हती.

जानेवारी 2021 मध्ये 51 वा इफ्फी झाल्यामुळे गेल्या 10 महिन्यात पुरेसे सिनेमे निर्माण झाले असतील याबद्दल थोडी साशंकता होती. पण तरिही आम्ही इएसजीच्यावतीने हा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत पोहोचवलाआणि आमची त्यावर बैठक झाली त्यामध्ये या इफ्फीमध्ये ‘गोवा विभाग’ असला पाहिजे हे सर्वानुमते ठरल्यामुळे आज अधिकृतरित्या या विभागाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गोमंतकीय सिनेकर्मींनी लाभ घ्यावा.

- सुभाष फळदेसाई, उपाध्यक्ष, गोवा मनोरंजन सोसायटी.

किमान चार प्रवेशिका समाविष्ट

आज दुपारी गोवा मनोरंजन सोसायटीच्या संकेतस्थळावर ‘गोवा विभागा’ची अधिकृत घोषणा करण्यात आली. यात प्रीमिअर आणि नॉन प्रीमिअर असे दोन ठळक उपविभाग असून 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर या दरम्यान निर्माण झालेले कोंकणी किंवा मराठी भाषेतील सिनेमे आणि कोंकणी, हिंदी, मराठी, इंग्लीश या भाषेतील लघुपट/माहितीपट यांचा समावेश करण्यात आला आहे. सिनेमा आणि लघुपट विभागामध्ये प्रत्येकी किमान 4 प्रवेशिका आल्या तरच सदर विभाग इफ्फीमध्ये समाविष्ट होईल, असेही नमूद करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

धक्‍क्‍यांच्‍या विस्‍ताराचा प्रस्‍ताव नाही! 'एमपीए'चे 'एनजीटी'ला पत्र; 11 दशलक्ष टनांपर्यंतच कोळसा हाताळणी

SCROLL FOR NEXT