If petrol and diesel prices are unaffordable, then electric vehicles should be used Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

बांधकाम मंत्र्यांचा गोवेकरांना अजब-गजब सल्ला

सीएनजीच्या किमतीही भडकल्या

दैनिक गोमन्तक

बुधवारी देशात नेहमीप्रमाणे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. यावेळीही दोन्हीच्या दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या 16 दिवसांतील ही 14वी वाढ आहे. 24 मार्च आणि 1 एप्रिल रोजी इंधनाचे दर समान राहिले. बुधवारी झालेल्या वाढीनंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 105.41 रुपयांवर पोहोचली आहे, तर डिझेलची किंमत 96.67 रुपये प्रति लिटरने विकली जात आहे.

दरम्यान, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाढत्या महागाई विरोधात आंदोलने देखील करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल (Nilesh Cabral) म्हणाले की पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. नागरिकांना हे दर परवडत नसतील तर त्यांनी इलेक्ट्रिक (Electric) वाहनांचा वापर करावा असा गजब सल्ला त्यांनी गोवेकरांना दिला आहे.

तसेच मडगाव - काणकोण राष्ट्रीय हमरस्ता डांबरीकरणाचे काम बंद खात्याच्या अनास्थेमुळे किंवा कंत्राटदाराला पैसे न दिल्यामुळे बंद झालेले नसून कंत्राटदाराने हे काम अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही, असा खुलासा आज सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी केला.

दरम्यान, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ होत असताना सीएनजीच्या (CNG) किमतीही भडकल्या आहेत. महागाईचा फटका सर्वसामान्यांवर पडत आहे. दिल्लीत बुधवारी पुन्हा एकदा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) किमतीत वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे दिल्लीत सीएनजीची किंमत 2.5 रुपयांनी वाढून 66.61 रुपये प्रति किलो झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT