Goa Police Nakabandi Ref Image Dainik Gomantak
गोवा

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

IAS officer car stopped Goa: पोलिसांनी कार चालकाला लायसन्स दाखविण्याची विनंती केली त्यावेळी चालकाने आयडी कार्ड दाखवत तो आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले.

Pramod Yadav

पणजी: नाकाबंदीवेळी आयएएस अधिकाऱ्याची कार अडवून तपासणी केल्याने गोव्यात मोठा गोंधळ झाला. या प्रकरणाची एसपींनी दखल घेऊन नाकाबंदीच्या ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला उठाबशा काढायला लावल्या. राज्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनीही या प्रकरणी बोलताना एसपींची कारवाई अनुचित असल्याचे मत मांडले.

झाले असे की, सांताक्रूझ येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी ये – जा करणाऱ्या वाहनांची तपासणी व चालकांची चौकशी करत होते.

दरम्यान, यावेळी एक चारचाकी आली या कारला थांबवून पोलिसांनी चौकशी केली. बीआर नोंदणीकृत कार पणजीच्या दिशेने निघाले होते. पोलिसांनी कार चालकाला लायसन्स दाखविण्याची विनंती केली त्यावेळी चालकाने आयडी कार्ड दाखवत तो आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले.

यानंतर आयएएस अधिकारी कारमधून खाली उतरला आणि त्याने कारमधील सर्व साहित्य खाली फेकून दिले. यानंतर पोलिसांनी कारची तपासणी करण्यास सांगितले. आयएएस अधिकारी पुन्हा कारमध्ये सर्व साहित्य भरुन घटनास्थळावरुन निघून गेला. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची या अधिकाऱ्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केली.

आयएएस अधिकाऱ्याच्या तक्रारीची दखल घेऊन उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी नाकाबंदीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला फोन करुन पर्वरी पोलिस स्थानकात येण्यास सांगितले व उठाबशा काढण्यास सांगितले. राज्याचे पोलिस महासंचालक यांनी याप्रकरणाची दखल घेऊन एसपी मडकईकरांनी केलेली कारवाई अनुचित असल्याचे म्हटले आहे.

"माझं एसपी मडकईकरांशी बोलणं झालं आहे. मडकईकरांनी नियम पुस्तकीचे पालन करावे, कर्मचाऱ्यांना उठाबशा कढण्यास लावू नये. नाकाबंदीवर असणाऱ्या पोलिसांना योग्य सूचना देण्यात याव्यात तपासणी करताना कशा पद्धतीने वागावे याची माहिती देण्यात यावी, अशी सूचना मडकईकरांनी केली", अशी माहिती आलोक कुमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT