British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Candolim deaths British tourists: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॅरी गेरार्ड गेल्या काही दिवसांपासून फुफूसाशी निगडीत आजाराचा सामना करत होते.
Tragic Death
DeathDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी ६३ वर्षीय ब्रिटिश नागरिकाचा मृत्यू झाला. येथील बीच रिसॉर्टमध्ये वास्तव्यास असणाऱ्या या व्यक्तील त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

बॅरी मार्क गेरार्ड (६३) असे मृत ब्रिटिश नागरिकाचे नाव आहे. कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत कळंगुट पोलिसांनी पहाटे दोनच्या सुमारास फोन करुन माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोग्य केंद्रात दाखल होत माहिती घेऊन बॅरी यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

Tragic Death
Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॅरी गेरार्ड गेल्या काही दिवसांपासून फुफूसाशी निगडीत आजाराचा सामना करत होते. पोलिसांनी बॅरीचा भाऊ पॉल मॅटीस यांना या घटनेची माहिती दिली. बॅरी यांच्यासोबत पॉल देखील गोव्यात होते.

दरम्यान, गेल्या एक महिन्याच्या कालावधीत कांदोळी परिसरात तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

Tragic Death
Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर, 50 हजारांच्‍या हमीवर मुक्‍तीचा आदेश

विल्यम ग्रीफिथ या ५४ वर्षीय ब्रिटिश नागरिकाचा ०३ डिसेंबर रोजी कांदोळीत मृत्यू झाला. त्यांना देखील कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला होता.

ग्रीफिथ मृत्यू होण्यापूर्वी तीनच दिवस अगोदर गोव्यात आले होते. तसेच, स्टिफन पॅट्रीक पॅटीसन (६६) या ब्रिटिश नागरिकाचा ०२ डिसेंबर रोजी कांदोळीत मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com