Viral Post eSakal.com No. 1 Marathi news website in India
गोवा

Viral Post: 'मी गोवा आणि भारताचा तिरस्कार करतो, राज्य सुरक्षित नाहीये, CM इतिहास पुन्हा लिहण्यात व्यस्त'; व्हायरल पोस्ट

Viral Post Related To Goa: Reddit या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर गोव्यातील एका व्यक्तीने तो गोवा आणि भारताचा तिरस्कार करतो, असे म्हटले आहे.

Pramod Yadav

पणजी: गोवा पहिल्या सारखा सुरक्षित राहिलेला नाही. मुख्यमत्र्यांना गोव्याशी काही घेणदेणं नाही, ते इतिहास पुन्हा लिहण्यात व्यस्त आहेत. मी गोवा आणि भारताचा तिरस्कार करतो. माझ्याच राज्यात मला परराज्यातील असल्यासारखं वाटतंय, अशी भावना गोव्यातील एका व्यक्तीने व्यक्त केली आहे. यासंबधिची पोस्ट रेडिट या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Reddit हे नव्याने उदयाला आलेला सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. येथे स्वत:ची ओळख गुप्त ठेऊन कोणत्याही विषयावर मत मांडता येते. तसेच, इतरांना त्यावर मतं प्रकट करता येतात. दरम्यान, नुकतेच या प्लॅटफॉर्मवर गोव्यातील एका व्यक्तीने तो गोवा आणि भारताचा तिरस्कार करतो, असे म्हटले आहे. तसेच, यामागची कारणे देखील त्याने पोस्टमध्ये सांगितली आहेत.

काय आहे रेडिट पोस्ट?

मी गोवा आणि भारताचा तिरस्कार करतो

"माझा जन्म गोव्यात झाला. पण गोव्याबद्दल माझं प्रेम आता पहिल्यासारखं राहिलेले नाही, तसेच राज्य सुरक्षितही राहिलेले नाही. समाज खूप विदारक झालाय, मुख्यमंत्र्यांना गोव्याचं काही पडलेलं नाही. त्यांचं लक्ष समस्या सोडविण्या ऐवजी इतिहास पुन्हा लिहण्यात व्यस्त आहेत. माझ्याच राज्यात मला परराज्यातील असल्याची भावना निर्माण झालीय, अशी पोस्ट या व्यक्तीने केली आहे."

Reddit Post

गोवा सबरेडिटवर शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी विविध मतं व्यक्त केली आहेत. "फोंड्यात गेल्या दहा वर्षापासून खोदकाम सुरु असून, या काळात रस्त्यावर गाडी चालवायला मिळाली नाही. गॅस पाईपलाईन, गटार किंवा वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे असे सांगून हे काम सुरु आहे. पण, अद्याप ही कनेक्टिव्हिटी अद्याप घरांपर्यंत पोहोचली नाही. गोव्यातील रस्त्यांचा मला देखील कंटाळा आला आहे. हा विकास असेल तर मलाही विकास नकोय", अशी प्रतिक्रिया एकाने पोस्टवर दिली आहे.

"हे विसरायला नको की ते नैसर्गिक अधिवास देखील नष्ट करण्याचा प्रयत्न करतायेत. मला समजत नाही एखादे सरकार असं काय करु शकतं, प्राण्यांसाठी येथे काहीच उरलेलं नाही", अशी आणखी एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Reddit Post

"गोव्यात कोकणी बोलणारे लोक कमी झालेत. मला तिरस्कार या गोष्टीचा येतो की, गोमंतकीय गोवा सोडतायेत असे नेते मंडळीच सांगत आहेत. कोणाला आपलं घर सोडायला आवडतं. आर्थिक अडणीमुळे नागरिक गोवा सोडतायेत.आणि राजकीय नेते मतासाठी बाहेरच्यांना साथ देतायेत", अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युझरने दिली आहे.

"टॅक्सी माफियांकडून त्यांची एक्की शिकण्यासारखी आहे. त्यांच्या प्रमाणे आपण एकत्र झाले तर आपल्या देखील मागण्या पूर्ण होतील. पण, तसे होणे शक्य नाही. येथे काहीही बोलता येऊ शकतं पण, बाहेर पडून आवाज उठवल्यानंतरच खरा बदल घडेल", असे मत एका रेडिट युझरने मांडले आहे.

Reddit Post

"कोरोनानंतर गोवा अचानक बदलला. गोव्याची सामान्यतः सहिष्णू संस्कृती ही द्वेषाची आणखी एक प्रजननभूमी बनली आहे. स्वातंत्र्यानंतर गोवा पर्यटकांसाठी इतका चांगला होता तर आता काय बदलले"? असा सवाल एका युझरने उपस्थित केला आहे.

"पणजीत बंगळुरुचा एक पर्यटक गटारात लघुशंका करताना दिसला. त्यांच्यातला एकाने एका मेडिकलजवळ तोच प्रकार केला. या दर्जाचे पर्यटक आपल्याला हवेत का"? असा सवाल या प्रतिक्रियेवर मत व्यक्त करताना मूळ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने उपस्थित केला आहे.

याशिवाय या पोस्टवर अनेकांनी मतं व्यक्त केली आहेत. गोवा दुर्दैवाने भारताचा भाग असून, आपण आणखी काय अपेक्षा करु शकतो, असे एका युझरने मत व्यक्त केले आहे. या पोस्टला अनेकांनी लाईक केले असून, मोठ्या प्रमाणावर शेअर केले आहे. तसेच, अनेकांनी यावर मतं व्यक्त केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

SCROLL FOR NEXT