Mormugao: कामगारांना धमकावू नका, अन्यथा कारवाई करणार! कचरा शुल्कप्रकरणी मुरगाव पालिका आक्रमक

Mormugao Municipal Council: जमा झालेला कचरा कुठेही उघड्यावर फेकला जातो. जमा झालेला कचरा कामगारांकडे देण्यात यावा यासाठी मुरगाव पालिका जागरूकता करीत आहे.
Mormugao Municipal Council
Mormugao Municipal CouncilNo. 1 Marathi news website in India esakal.com
Published on
Updated on

वास्को: दारोदार कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या कामगारांना धमकावणाऱ्या तसेच कचरा शुल्क न देणाऱ्या एका व्यक्तीविरोधात पोलिस कारवाई तसेच पाणी व वीज कनेक्शने तोडण्यासंबंधीची कारवाई करण्याची तयारी मुरगाव पालिकेने केली आहे. तसेच त्या भागातील जे कोणी कचरा शुल्क देत नाही, त्यांच्याकडून दंड आकारण्यासंबंधीच्या नोटिसा पाठविण्यास मुरगाव पालिकेने आरंभ केला आहे.

पालिकेने दारोदार कचरा गोळा करण्यासाठी कंत्राट दिले आहे. कंत्राटदाराचे कामगार दारोदार जाऊन कचरा गोळा करतात. तथापि, काहीजण त्या कामगारांकडे कचरा दिल्यास कचरा शुल्क द्यावे लागेल म्हणून त्यांच्याकडे कचरा देतच नाहीत. जमा झालेला कचरा कुठेही उघड्यावर फेकला जातो. जमा झालेला कचरा कामगारांकडे देण्यात यावा यासाठी मुरगाव पालिका जागरूकता करीत आहे. तथापि, काहीजण अद्याप कचरा त्या कामगारांकडे देण्यास तयार नाही. त्यांच्याविरोधात दंडात्मक तसेच वीज, पाणी कनेक्श्ने तोडण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येथील एका प्रभागातील एका व्यक्तीने कामगारांकडे दादागिरी करत आपल्या घरासमोरच्या रस्त्याकडेला कचरा पेट्या ठेवू नका. तेथून त्या काढा यासाठी ती व्यक्ती कामगारांना धमकावत होती.

Mormugao Municipal Council
Mormugao: मुरगावातील 'ब्लॅक स्पॉट'चे रुपडे पालटणार! कचरा व्यवस्थापनासंदर्भात पालिकेचा निर्णय, CCTV ठेवणार नजर

त्या व्यक्तींने आपल्या चाळीत बरेच भाडेकरू ठेवले आहेत. तथापि, त्याचा कचरा शुल्क देण्यास तो तयार नाही. दोन दिवसांपूर्वी त्याने त्या कामगारांकडे पुन्हा दादागिरी केल्याने मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी त्या व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार करण्यासंबंधी नोट लिहिल्याचे समजते. तेथील जे कोणी कचरा शुल्क देत नाही, त्यांना प्रथम २५० रुपये दंड तर व्यापारी असल्यास त्याला ५०० रुपये दंड आकारण्यासंबंधी नोटिसा पाठविण्यात येणार आहे. हा दंड त्यांना २४ तासांमध्ये मुरगाव पालिका तिजोरीत जमा करावा लागणार आहे.

Mormugao Municipal Council
Mormugao: कचरा न देणाऱ्यांना येणार ‘नोटिसा’! मुरगाव पालिकेचा निर्णय; शुल्क न भरल्यास 200 रुपये दंडाची तरतूद

दरम्यान, आपल्या घरासमोरील रस्त्याकडेला कचरा पेट्या ठेवण्यात आल्याने आसपासचे लोक तेथे कचरा टाकतात. जेणेकरून आपल्याला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्या पेट्या तेथून काढाव्यात अशी मागणी त्या व्यक्तीने केली होती. तथापि, त्याने त्यासंबंधी योग्य मार्ग न चोखळता त्या कामगारांना धमकावले. त्यामुळे प्रकरण गंभीर झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com