Babu Kavlekar Dainik Gomantak
गोवा

पत्नीला उमेदवारी नाकारली म्हणून मी भाजपवर नाराज नाही: बाबू कवळेकर

विश्वजित राणे व बाबुश मोन्सरात यांच्या पत्नींना भाजपने (BJP) उमेदवारी दिली. मात्र, कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांना नाकारली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: कुणाला उमेदवारी द्यायची आणि कुणाला नको , हा निर्णय पक्षाने घ्यायचा असतो, पक्षाने माझ्या पत्नीला उमेदवारी दिली नाही तरी मी पक्षावर बिलकुल नाराज नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी व्यक्त केली. (Babu Kavlekar BJP Latest News)

विश्वजित राणे व बाबुश मोन्सरात यांच्या पत्नींना भाजपने (BJP) उमेदवारी दिली. मात्र, कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांना नाकारली यावर कवळेकर यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील उत्तर दिले.

मात्र, त्यांच्या पत्नीने केलेल्या बंडाबद्दल विचारले असता ते म्हणाले, तो तिचा निर्णय आहे. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. पण मी पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. पक्षाने दिलेले कोणतेही काम करण्याची माझी तयारी आहे.

विरोधी पक्षात असल्याने माझ्या मतदारसंघातील कामे होत नव्हती. त्यामुळेच मी भाजपात गेलो. भाजपात गेल्यावर केपे मतदारसंघात झालेली कामे लोकांनी पहिली आहेत. लोक मला त्याची पावती देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मतदार नाराज, यात तथ्य नाही

मागच्या चार निवडणुका काँग्रेसच्या (Congress) उमेदवारीवर निवडून आलेले कवळेकर हे पहिल्यांदाच भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक (Election) लढवत आहेत. त्यामुळे मतदार त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते. याबद्दल त्यांना विचारले असता, यात काहीच तथ्य नाही. माझे पूर्वीचे समर्थक माझ्याच बरोबर आहेत. त्यात भाजप कार्यकर्त्यांची भर पडली आहे. हे पाहता मी पूर्वीपेक्षाही अधिक मताधिक्याने जिंकून येईन याची मला खात्री आहे असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT