पणजी: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी बुधवारी नोकरशहांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बोलताना ते म्हणाले, आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत करत आहोत का? आपण भ्रष्टाचारापासून मुक्त आहोत का? याबाबत सर्व नोकरशहांनी आत्मपरीक्षण करावे. (P. S. Sreedharan Pillai Latest News)
दरम्यान, राज्यपालांनी गोव्यातील मतदारांना कोविड-19 नियमांचे काटेकोरपणे पालन करून आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. लोकांना संबोधताना ते म्हणाले, भारतीय राज्यघटनेनुसार देशातील लोक सर्वोच्च आहेत आणि इतर सर्वजण त्यांच्या अधीन आहेत. प्रत्येकाने मतदान केले पाहिजे कारण प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. आम्ही मतदान केंद्रे वाढवली आहेत. लोकानी उत्स्फूर्तपणे मतदान करावे.
गोव्यातील 98 टक्के लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले आहे असे सांगून पिल्लई यांनी कोरोनापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल डॉक्टर, फ्रंटलाइन आणि आरोग्य सेवा कर्मचार्यांचे कौतुक केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.