security guard killed Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: मिरामार येथील हॉटेलच्या कॅसिनोत पहाटे राडा! हैद्राबादच्या पर्यटकाकडून सुरक्षा रक्षकाचा खून

Casino Murder Goa: या घटनेत एका पर्यटकासोबत झालेल्या भांडणात एका सुरक्षा कर्मचाऱ्याची हत्या झाल्याचा आरोप आहे

Akshata Chhatre

पणजी: राजधानी पणजीतील मिरामार येथील एका नामांकित फाईव्ह स्टार हॉटेलमधील कॅसिनोमध्ये शुक्रवारी (दि.२९) पहाटे एक धक्कादायक आणि हिंसक घटना घडली. या घटनेत एका पर्यटकासोबत झालेल्या भांडणात एका सुरक्षा कर्मचाऱ्याची हत्या झाल्याचा आरोप आहे. हैदराबादहून आलेल्या पर्यटकाने केलेल्या हल्ल्यात हा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी होऊन मरण पावला. पणजी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. मिरामार येथील सुप्रसिद्ध 'स्टार मॅरियट हॉटेल' मधील कॅसिनोमध्ये हा थरार घडला. या मारहाणीत एक सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाला, आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कॅसिनोमध्ये उपस्थित असलेल्या एका पाहुण्यासोबतच्या वादामुळे घडली असावी. हैदराबाद येथील पाहुण्याने कोणत्या कारणावरून वाद घातला आणि त्याचे रुपांतर इतक्या गंभीर घटनेत कसे झाले, याबाबत अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पणजी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून तपास सुरू केला. मृत सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.

गोव्यासारख्या पर्यटनस्थळी, विशेषतः कॅसिनोसारख्या ठिकाणी अशा प्रकारच्या हिंसक घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, लवकरच या घटनेमागील नेमके कारण आणि इतर तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

SCROLL FOR NEXT