Goa Casino: मित्रच निघाला गद्दार! कांदोळीत कॅसिनोला दिल्लीकारने लावला साडेसहा लाखांचा चुना

Goa casino fraud: कांदोळीतील फिनिक्स कॅसिनोमध्ये एका दिल्लीतील माणसाने कॅसिनोला तब्बल पावणे सात लाख रुपयांचा गंडा घातला
Candolim casino scam
Candolim casino scamDainik Gomantak
Published on
Updated on

कांदोळी: गोव्यात कॅसिनोचा व्यवसाय बराच प्रसिद्ध आहे. फक्त देशातूनच नाही तर विदेशातून देखील पर्यटक कॅसिनोच्या आकर्षणाने गोव्याच्या दिशेने वळतात. मात्र कांदोळीतील फिनिक्स कॅसिनोमध्ये एका दिल्लीतील माणसाने कॅसिनोला तब्बल पावणे सात लाख रुपयांचा गंडा घातला आहे. डेस्कवरून काही पैसे उचलून त्याने अर्धी रक्कम खेळात वाया घालवली आणि पावणे तीन लाख रुपये घेऊन पळ काढला. गोवा पोलिसांनी संशयित पंकज सचदेवा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कॅसिनोलाच घातला गंडा

गुरुवारी (दि.२७ फेब्रुवारी) रोजी संध्याकाळी ३.३९ वाजता ही घटना घडल्याची बातमी उघड झाली आहे. घडलेल्या एकूण प्रकारात बन्सल नावाचा एक माणूस चिप्स घेऊन रोख पैसे आणण्यासाठी कॅसिनोच्या कॅश डेस्कवर होता आणि तेव्हाच त्याला एक फोन आला.

Candolim casino scam
Casinos In Mandovi : जागा शोधा आणि शिफ्ट व्हा! मांडवीतील कॅसिनोंचा उठ्या होणार; लवकरच सरकारी आदेश

हीच संधी साधून संशियत आरोपी पंकज सचदेवा याने बन्सलनेच त्याला रक्कम आणायला लावल्याचे सांगून रक्कम उचलली. या रकमेतील ४ लाख रूपये त्याने कॅसिनो खेळात घालवले आणि राहिलेले पैसे घेऊन फरार झाला.

बन्सल नावाच्या इसमाचा फोन संपताच तो पैसे घेण्यास परत आला मात्र तोपर्यंत भरपूर उशीर झाला होता. यानंतर कॅसिनोच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीचा भरपूर शोध घेतला मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. एकूण प्रकार उघड झाल्यानंतर कॅसिनो व्यवस्थापकांनी कळंगुट पोलिसांजवळ धाव घेऊन आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली. सध्या पोलीस निरीक्षक परेश नाईक या घटनेचा तपास करत आहेत.

बन्सल हा आरोपीचा मित्र:

समोर आलेल्या माहितीनुसार बन्सल हा आरोपीचा मित्र आहे. हे दोघे हिल्टन रिसॉर्टमध्ये असलेल्या फिनिक्स कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी यायचे. इथेच त्यांची मैत्री झाली आणि बन्सल याच्याच सांगण्यावरून आरोपी अनेकवेळा अधूनमधून कॅसिनो गीफ्ट चिप्स कॅश डेस्कवर देऊन खेळण्यासाठी आणायचा, मात्र शेवटी त्यानेच बन्सलची फसवणूक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com