Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 1.2 कोटींच्या सायबर फसवणुकीप्रकरणी कर्नाटकातील 63 वर्षीय व्यक्तीला अटक

Goa Cyber Fraud Case: गोवा सायबर क्राइम पोलिसांनी 1 कोटी 2 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या सायबर फसवणुकीप्रकरणी एका 63 वर्षीय व्यक्तीला अटक केली. जुन्या गोव्यातील एका व्यक्तीच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली.
Goa Cyber Crime
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत कमालीची वाढ झाली आहे. याचदरम्यान गोवा सायबर क्राइम पोलिसांनी 1 कोटी 2 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या सायबर फसवणुकीप्रकरणी एका 63 वर्षीय व्यक्तीला अटक केली. जुन्या गोव्यातील एका व्यक्तीच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कर्नाटकातून या 63 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले.

तक्रारीनुसार, पीडित व्यक्तीस ‘एएसके स्मार्ट प्रॉस्पेक्ट वाय5’ या नावाने चालवण्यात येणाऱ्या बनावट ट्रेडिंग योजनेत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. 15 मे 2025 पूर्वी, विविध मोबाईल क्रमांक आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधत आरोपीने चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून पीडिताकडून 1,02,42,325/- रुपये उकळले. या रकमेचे हस्तांतरण अनेक बँक खात्यांमध्ये करण्यात आले.

Goa Cyber Crime
Goa Cyber Crime: गोलमाल है! गोव्यातील सायबर गुन्ह्यांमध्ये गमावले तब्बल *0* कोटी रुपये, वाचा पोलिसांनी काय सांगितले?

तक्रारीच्या आधारे, सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम 318(4), 319(2) आर/डब्ल्यू 3(5) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66-डी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पीआय दीपक पेडणेकर आणि एसपी राहुल गुप्ता (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली एलपीएसआय यशिका सांकोलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कर्नाटकातील शिवमोगा येथे जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. कृष्णा मूर्ती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चौकशीदरम्यान उघड झाले की, आरोपीने फसवणुकीतून मिळालेल्या पैशांपैकी 5 लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा करुन इतर पैसे त्याच्या सहकाऱ्यांना हस्तांतरित केले होते. विशेष म्हणजे, त्याने “बाप्पा मशीन प्रायव्हेट लिमिटेड” या नावाने एक चालू खाते उघडले होते. या खात्याच्या माध्यमातून 3 वेगवेगळ्या राज्यांतील पाच सायबर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग समोर आला असून एकूण फसवणुकीची रक्कम सुमारे 6.5 कोटी रुपये असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Goa Cyber Crime
Goa Cyber Crime: राज्यात सायबर ठगांचा सुळसुळाट! गोमंतकीयांना लाखोंचा चुना; दुप्पट पैशांचा मोह पडला भारी

सध्या आरोपी तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत असून गोवा सायबर क्राइम पोलिस स्टेशनचे पीआय दीपक पेडणेकर यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com