Court
Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

Pramod Yadav

Goa Crime News

शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून केल्याची घटना 25 मार्च 2019 रोजी झुआरीनगर येथे घडली होती.

या प्रकरणातील संशयित आरोपी पती अशोक कुमार याला दक्षिण गोवा सत्र न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. कुमारने बिर्ला चौकीत पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी अशोक कुमारला पत्नीच्या खून प्रकरणात दोषी ठरवले आहे. मूळ ओडिशाचा रहिवासी असणारा अशोक याचे केरळच्या बिंदू (३९) हिच्याशी लग्न झाले होते.

दोघांना एक तीन वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षीय मुलगी आहे. आरोपींवर लावण्यात आलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ फिर्यादी पक्षाने न्यायालयासमोर १५ साक्षीदार हजर केले. साक्षीदारांमध्ये त्यांच्या पाच वर्षीय मुलाचाही समावेश आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

मूळ ओडिशाचा रहिवासी असणारा अशोक कुमार याचे केरळच्या बिंदू (३९) हिच्याशी लग्न झाले होते. अशोक आणि बिंदू झुआरीनगर येथे दोन मुलांसोबत राहत होते. दरम्यान, २९ एप्रिल २०२९ रोजी पत्नीने शारीरिक संबधास नकार दिल्याने रागावलेल्या अशोकने तिचा गळा दाबून खून केला.

घटनेनंतर तब्बल पाच वर्षाने अशोकने केलेला गुन्हा मान्य केला आहे. येत्या २९ एप्रिल रोजी त्याला शिक्षा सुनावली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women In Goa Startup: देशापेक्षा गोव्याची सरासरी अधिक; स्टार्टअपमध्ये महिलांचा डंका

Goa News : ‘आमुरचंवर’ लेखसंग्रह ठरेल भावी पिढीसाठी मार्गदर्शक: मिनाक्षी मार्टिन्स

Chhattisgarh Accident: मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, पिकअपखाली चिरडून 15 मजुरांचा मृत्यू; 20 हून अधिक जखमी

Goa Today's Live News: आप बाणावलीची जिल्हा पंचायत निवडणूक लढणार - व्हेंझी

Viral Video: पट्ट्यानं अशी सर्जरी केली, तुम्हीही व्हिडिओ पाहून डोक्यावर माराल हात; म्हणाल, ‘’असला सनकी कधीच पाहिला नाही’’

SCROLL FOR NEXT