Goa Demand High Court: गोव्यात स्वतंत्र उच्च न्यायालयाची मागणी; बार असोसिएशनचा ठराव

Goa Demand High Court: गेल्या अनेक वर्षापासून असोसिएशनची ही मागणी प्रलंबित होती, या हालचालींना सरकारच्या मदतीने वेग आला आहे.
HIGH COURT OF BOMBAY AT GOA
HIGH COURT OF BOMBAY AT GOADainik Gomantak
Published on
Updated on

Goa Demand High Court

गोवा राज्याला स्वतंत्र उच्च न्यायालय देण्यात यावे असा ठराव गोवा उच्च न्यायालय बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत एकमताने संमत करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून असोसिएशनची ही मागणी प्रलंबित होती. त्यामुळे आता या हालचालींना सरकारच्या मदतीने वेग आला आहे.

पर्वरी येथील उच्च न्यायालयाच्या आवारात शुक्रवारी (दि. २६) संध्याकाळी गोवा उच्च न्यायालय बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा पार पडली. कुएल पेरेरा या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेत उच्च न्यायालयातील अनेक वकिलांनी उपस्थिती लावली.

गोवा हे वेगळे राज्य असल्याने घटनेनुसार स्वतंत्र उच्च न्यायालय असायला हवे, असे म्हणणे सभेत मांडण्यात आले.

गोव्यात स्वतंत्र उच्च न्यायालय झाल्यास राज्यातील न्यायाधीशांची संख्या वाढेल तसेच, प्रलंबित खटले वेळेत निकाल निघण्यास मदत होईल, असे मत या सभेत मांडण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Chimbel Illegal Borewells
Goa Police Seniority Dispute Case
Bombay high court goa bench
Neogi Mansion Demolition
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com