Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: पैसे घेता मग, जत्रेतील कचऱ्याची जबाबदारी कोणाची?

पालिकेने न चुकता पैसे घेतले मग कचऱ्याची जबाबदारी कोणाची असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा येथील प्रसिद्ध बोडगेश्वर यात्रेनिमित्त लागलेल्या फेरीला आता दहा दिवस उलटून गेले आहेत. या जत्रेत भरमसाठ फेरीवाले आले आहेत. विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ खरेदीसाठी अनेक नागरिक देखील या फेरीला भेट देत आहेत.

दरम्यान, या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा झाला असून, तो पालिकेकडून हटविला जात नसल्यामुळे नागरिक आणि फेरीवाल्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, पालिकेने न चुकता पैसे घेतले मग कचऱ्याची जबाबदारी कोणाची असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.

जत्रेनिमित्त आलेल्या फेरीवाल्याकडून पालिका भरमसाठ पैसे घेते. त्याबदल्यात त्यांना कोणत्याच सुविधा दिल्या जात नाहीत. याशिवाय परिसरात होणारा कचरा देखील पालिकेकडून वेळेवर हटविला जात नाही. त्यामुळे कशासाठी पालिकेला पैसे द्यायचे अशा शब्दात यात्रेतील फेरीवाल्यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली.

पालिकेचे कर्मचारी याठिकाणी येतात पाहतात आणि निघून जातात. पण कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही असे फेरीत सहभागी दुकाणदार म्हणाले.

Mapusa

फेरीत सहभागी एक दुकानदार याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, पालिका फेरीवाल्यांकडून भरमसाठ पैसे घेते, पैसे घेण्याबाबत आमची तक्रार नाही. पण, त्याबदल्यात आम्हाला सुविधा म्हणून काहीच दिले जात नाही.

महिला, पुरूषांसाठी वेगवेगळ्या स्वच्छतागृहांची सोय नाही. कचरा सुरूवातीला घेऊन गेले, त्यानंतर साठलेला कचरा तसाच पडून आहे. मग पालिकेचे फक्त पैसे घेण्याचे काम आहे का? असा सवाल दुकानदारांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT