Goa Swim Team Without Coach Dainik Gomantak
गोवा

Goa Swimming: कसे येणार गोव्यात ‘ऑलिम्पिक’ पदक? सहा वर्षापासून जलतरण खेळासाठी अनुभवी प्रशिक्षकच नाही

Goa Swim Team Without Coach: ओडिशातील भुवनेश्वर इथे झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर-ज्युनियर स्पर्धेतील रौप्य आणि कांस्य पदके प्राप्त केलेल्या विहान ला प्रशिक्षणासाठी जाव लागतयं बंगळुरूला.

Vinayak Samant

Goa Swim Team Without Coach: गोव्यात 37 व्या राष्ट्रीय स्पर्धा नियोजित आहेत. तर, गोव्याच्या तयारीवर ‘ऑलिम्पिक’ संघटना असमाधानी असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घालून ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

मात्र प्रत्यक्षात गोव्यात खेळाडूंना सरावासाठी पुरेशा आणि योग्य साधनसामुग्रीची उपलब्धता आहे का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. गोव्यात जलतरण खेळासाठी प्रशिक्षकच उपलब्ध नाहीय, अशी माहिती नुकतीच समोर आलीय.

एकीकडे जलक्रीडा संबंधित पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना साहाय्य करण्याकरिता मंत्रालय ठोस प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे तज्ञ प्रशिक्षक उपलब्ध नसल्याने येथील खेळाडूंना विदेशात जाऊन प्रशिक्षण घ्यावे लागत आहे.

हल्लीच ऑगस्ट महिन्यात ओडिशातील भुवनेश्वर इथे झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर-ज्युनियर स्पर्धेत ५० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्य आणि कांस्य पदके प्राप्त केली.

साखळीतील सेंट जॉन क्रॉस विद्यालयात ६ वी च्या वर्गात शिकणाऱ्या विहान शैलेश पेडणेकर याने ही करामात केली आहे. वर्ष २०१७ नंतर पहिल्यांदाच मुलांच्या गटात पदक प्राप्त झाले आहे. सध्या तो बंगळुरू येथे गेल्या वर्षभरापासून सुरजीत गांगुली यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.

विहान चा दिवस सुरू होतो पहाटे ५ वाजता. अर्धा तास व्यायाम झाल्यावर ६ ते ९ तीन तास तो पोहण्याचे प्रशिक्षण घेतो. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता त्याचे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर भावेश कुमार त्याचकडून दीड तास फिजिओ करून घेतात.

बंगळुरू मध्ये असल्याने विहान ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहे. त्याची शाळा त्याला खूप प्रोत्साहन आणि पाठिंबा देऊन त्याचा पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे दुपारी २ ते ४ या वेळेत विहान ऑनलाइन शिकतो.

संध्याकाळच्या सत्रात तो साडेतीन ते चार किलोमीटर पोहण्याचा सराव करतो आणि १०.३० पर्यन्त त्याचा दिवस संपतो.

विहानप्रमाणेच इतरही खेळाडूंचा साधारण हाच दिनक्रम असतो. त्याच्या पालकांचे असे म्हणणे आहे की गोव्यात जालतरणसाठी लागणारे स्पर्धात्मक वातावरण नसल्याने खेळाडूंना राज्याबाहेर तसेच देशाबाहेर प्रशिक्षण घ्यावे लागते.

राज्यात जालतरणाच्या स्पर्धा वाढायला हव्या. जेव्हा आपल्या मुलाला पदक प्राप्त होताना गोव्याचे नाव घेतले जाते तेव्हा खुप अभिमान वाटतो. त्यामुळे विहान जारी राज्याबाहेर प्रशिक्षण घेत असला तरी शेवटपर्यंत तो गोव्याकडूनच खेळत राहील असे त्याची आई प्राची पेडणेकर यांनी सांगितले.

गोव्यात जलतरण खेळाडूंसाठी योग्य प्रशिक्षक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध नाही हे सत्य असून गोव्यासाठी ती एक मोठी शोकांतिका आहे आणि म्हणूनच खेळाडू राज्याबाहेर आणि देशाबाहेर जाऊन प्रशिक्षण घेतात. सध्या चांगले प्रशिक्षक मिळणे कठीण झाले आहे. २-३ वेळा जाहिराती देऊन सुद्धा प्रशिक्षक यायला तयार होत नाहीये. खेलो इंडिया सारख्या स्पर्धेच्या प्रशिक्षकासाठी सहा महीने सरकारला थांबावे लागले. आता खजागी अकादमी चंगल्या पगारची नोकरी देत असल्याने सरकारी नोकरीसाठी प्रशिक्षक यायला तयार होता नाहीये. हल्लीच मी गुवाहाटी येथे नॅशनल गेम्स ला गेलो होतो तेव्हा माझ्या नजरेस हे आले की आसाम राज्याचे सरकार खेळांसाठी आणि खेळाडूंसाठी खूप पैसा खर्च करीत आहेत.
दिगंबर कामत, भारतीय जलतरण महासंघ, माजी अध्यक्ष
गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचे ४ जलतरण तलाव आहेत. मडगाव, पणजी, म्हापसा आणि फोंडा या ठिकाणी असलेल्या या तलावांवर प्रशिक्षकांची खुप गरज आहे. गेली सहा वर्षे एकही अनुभवी प्रशिक्षक गोव्यातील खेळाडूंसाठी उपलब्ध नाहीये.  सध्या राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या प्रशिक्षकाची खुप जास्ती गरज गोव्याला आहे. ती SAG ची जबाबदारी असते की त्यांनी ही गरज पुर्ण करावी. जर ही गरज पुर्ण झाली तर गोवा पुन्हा जलतरणात पदके मिळवू शकतो. आत्ताच्या खेळाडूंवर त्यांचे पालक सगळं खर्च करत आहेत या मध्ये आमचा काहीच हात नाहीये.       
सुदेश नागवेकर, भारतीय जलतरण महासंघ, खजिनदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT