Anjuna News: हणजुणेत सीआरझेड सर्व्हेला स्थानिकांचा विरोध; लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा

उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे कारण देत छळवणूक थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी
Anjuna News
Anjuna NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Anjuna News: उत्तर गोव्यातील सुप्रसिद्ध अशा हणजुणे (Anjuna) समुद्र किनाऱ्यावर सीआरझेड मार्फत सर्व्हेचे आज, गुरूवारी 7 सप्टेंबर रोजी काम हाती घेण्यात आले होते. तथापि, या कामाला येथील स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.

डिमोलिशनच्या बाबतीत आधी नोटीसा देण्यात न आल्याचे कारण पुढे करत हणजुण-वागातोर किनारी भागात लोकांनी सीआरझेडच्या अधिकाऱ्यांना काम करण्यापासून रोखून धरले.

सर्व्हेचे काम करायला आलेल्या पथकाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. ग्रामस्थांनी या कामात अडथळा आणत हे काम बंद पाडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी यासाठी बॉम्बे हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशांचा हवाला दिला.

Anjuna News
गोव्यात त्सुनामी? सायरन वाजला अन् सरकारी यंत्रणेची उडाली धांदल; 6 सप्टेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं?

तसेच यावेळी सरकारकडून सुरू असेलली ही छळवणूक बंद झाली नाहीतर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला.

सीआरझेड नियमांनुसार समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या भागात एखादे बांधकाम करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. येथील बांधकामांवर मर्यादा येत असतात. स्थानिक अधिवास, पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने सीआरझेडचे नियम तयार केलेले असतात. या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com