Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

Pooja Naik job scam: सरकारी नोकऱ्यांसाठीच्या घोटाळ्याचा तपास पोलिस करीत आहेत, त्यामुळे या घोटाळ्या प्रकरणी पूजा नाईक यांनी असेल ती माहिती पोलिसांना द्यावी
pooja naik case update
pooja naik case updateDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी, ता. ९ (प्रतिनिधी): सरकारी नोकऱ्यांसाठीच्या घोटाळ्याचा तपास पोलिस करीत आहेत. त्यामुळे या घोटाळ्या प्रकरणी पूजा नाईक यांनी असेल ती माहिती पोलिसांना द्यावी. या घोटाळ्यात कोण मंत्री आहेत आणि कोण अधिकारी आहेत त्यांची नावे पोलिसांपुढे उघड करावी, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवार (दि.९) रोजी मोरजी येथे सांगितले.

१७ कोटी परत न मिळाल्यास 'नावं उघड' करण्याचा इशारा

पेडणे येथे सहकार संमेलनासाठी ते आले असता पत्रकारांनी त्यांना पूजा नाईक घोटाळा प्रकरणासंदभांत विचारले, तेव्हा ते बोलत होते, पूजा नाईक यांनी आरोप करण्याऐवजी थेट पोलिसांना भेटून त्यांच्या पुढे या घोटाळ्यातील संबंधितांची नावे सांगावीत, संबंधितांवर त्वरित कडक कारवाई केली जाईल, मग ते कोणीही असो मंत्री असो की अधिकारी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

pooja naik case update
Pooja Naik: '17 कोटी परत द्या, अन्यथा..'! पूजा नाईक ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मंत्री, IAS अधिकारी, अभियंत्‍याची नावे जाहीर करणार?

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे कठोर विधान

पूजा नाईकच्या या आरोपांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने प्रतिक्रिया देत, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.

पूजा नाईक यांनी केलेल्या आरोपात तथ्य असेल, तर आपण पोलिसांना पुन्हा एकदा बोलावून त्यांना त्यांची एफआयआर नोंद करून पूर्ण चौकशी करण्याचे आदेश देतो. पूजा नाईक यांनी पोलिसांसमोर येऊन या घोटाळ्यातील संबंधितांची नावे उबड करावीत. जर त्यात तथ्य आढळले, तर आमचे सरकार संबंधितावर कड़क कारवाई करेल, त्यात मंत्री असला तरी गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी ठणकावून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com