Goa Mapusa Municipality
Goa Mapusa MunicipalityDainik Gomantak

Mapusa Municipality: म्हापसा नगरपालिकेतर्फे लवकरच कचरा व्यवस्थापनासाठी निविदा

स्वच्छता मोहीम : निधी वापरासाठी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रयत्न

Mapusa Municipality: तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर आता म्हापसा नगरपालिका कचरा व्यवस्थापनासाठी निधी वापरण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळविण्‍याच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतरच कचरा व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक निविदा काढली जाईल.

Goa Mapusa Municipality
Goa Drugs Case: सीबीआयने डुडू याला बजावली नोटीस; 25 रोजी सुनावणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, कामगार रजेवर जात असल्याने सणासुदीच्या काळात कामगारांची कमरता भागवण्याकरिता पालिका कामगारांच्या नियुक्तीसाठी लघू निविदा काढण्याची शक्यता आहे.

म्हापसा पालिका सध्या ब्लॅक स्पॉट्स व पालिका मार्केट व्यतिरिक्त सर्व २० प्रभागांमध्ये घरोघरी कचरा व्यवस्थापन करत आहे. सध्या पालिका त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रभागांच्या घरोघरी व्यवस्थापनासाठी सुमारे ७५ रोजंदारी कामगारांचा वापर करते. यापूर्वी, २० प्रभागांतील १० प्रभाग खासगी कंत्राटदाराला आऊटसोर्स केले होते. परंतु, कंत्राटदाराची मुदत संपल्याने पालिका गेल्या डिसेंबरपासून स्वतःच्या कामगारांचा वापर करून हे काम करत आहे.

पालिकेला सध्या ब्रेकडाऊनमुळे ट्रकची कमतरता तसेच कामगारांची अनुपलब्धता व इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यानुसार, नोव्हेंबर २०२२मध्ये पालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक निविदा काढण्याचा ठराव घेतलेला. ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन, गवत कापणे, बाजारपेठेची साफसफाई, रस्ता साफ करणे, ई-कचरा संकलन, औपचारिक कार्यक्रमांतून निर्माण होणारा कचरा हाताळणे यांचा समावेश असेल. त्यानुसार, प्रस्ताव तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. जो काही आठवड्यांपूर्वीच मंजूर झाला होता.

Goa Mapusa Municipality
CM Pramod Sawant: नार्वेतील तीर्थक्षेत्र परिसराचा विकास करणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावासाठी आम्हांला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे आणि आता आम्ही आर्थिक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहोत. कारण, पालिकेने १५व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी वापरण्याचा निर्णय घेतला होता आणि कचरा व्यवस्थापनासाठी उर्वरित रक्कम पालिका मंडळाच्या मंजुरीनंतर पालिकेच्या निधीतून वापरली जाईल, असे उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी सांगितले.

२० प्रभागात २० कामगार

सणासुदीच्या काळात कामगारांच्या कमतरतेमुळे म्हापशातील घरोघरी कचरा व्यवस्थापनावर परिणाम होतो, यावर भाष्य करताना फडके म्हणाले, नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांच्या उपस्थितीत आमची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये आम्ही रजेवर जाणाऱ्या कामगारांची यादी मागवली आहे. त्यानुसार, आम्ही कामगारांसाठी लघू निविदा काढण्याच्या आवश्यकतेबाबत निर्णय घेऊ, जसे की नाले उपसण्यासाठी केले जाते. गणेशोत्सवादरम्यान, घरोघरी जाऊन संकलन प्रभावीपणे करता यावे, यासाठी पालिका मंडळ सध्या २० प्रभागांमध्ये कार्यरत असलेल्या २० कामगार घरोघरी कचरा संकलन करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com