Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Commander Saifullah Viral Video: लश्करचा कमांडर सैफुल्लाह सैफ याच्या एका रॅलीतील व्हायरल व्हिडिओमुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
Commander Saifullah Viral Video
Hafiz Saeed Dainik Gomantak
Published on
Updated on

Commander Saifullah Viral Video: मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तैय्यबा (LeT) चा प्रमुख हाफिज सईद आता भारताविरुद्ध मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे गंभीर संकेत मिळत आहेत. लश्करचा कमांडर सैफुल्लाह सैफ याच्या एका रॅलीतील व्हायरल व्हिडिओमुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हाफिज सईद भारतावर हल्ला करण्यासाठी बांगलादेशचा 'लाँचपॅड' म्हणून वापर करण्याची योजना आखत आहे.

व्हायरल व्हिडिओतून कट उघड

सैफुल्लाह सैफचा हा व्हिडिओ 30 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या (Pakistan) खैरपूर तमीवाली येथे झालेल्या एका जाहीर रॅलीतून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सैफुल्लाह सैफ थेटपणे पाकिस्तानी तरुण आणि लहान मुलांना 'जिहाद' साठी तसेच भारताविरुद्ध बदला घेण्यासाठी भडकावत आहे.

सैफुल्लाह सैफने केलेल्या दाव्यानुसार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत हाफिज सईदचे कुटुंब मारले गेले, परंतु हाफिज सईद शांत बसलेला नाही. सैफुल्लाह म्हणतो की, भारताविरुद्ध बदला घेण्याची योजना सध्या सुरु आहे. तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण दिले जात आहे. पूर्व पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैय्यबाचे लोक सक्रिय आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच भारताला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.

Commander Saifullah Viral Video
Pakistan Terrorist Attack: पाकिस्तान पुन्हा हादरला! बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 पाकिस्तानी सैनिक ठार

तरुणांना भारताविरुद्ध भडकावणे

रॅलीमध्ये सैफुल्लाहने पाकिस्तानी सैन्याची स्तुती केली. त्याचवेळी भारताविरुद्ध गरळ ओकली. या रॅलीत अनेक लहान मुले देखील उपस्थित होती, ज्यांना लष्करचे दहशतवादी जिहादचा पाठ शिकवून भारतविरोधी बनवत आहेत आणि त्यांना दहशतवादी बनण्यासाठी प्रेरित करत आहेत. सध्या सैफुल्लाहच्या या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, हा व्हिडिओ अत्यंत गंभीर असल्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा या दाव्यांची सत्यता तपासण्यात सक्रिय झाल्या आहेत.

Commander Saifullah Viral Video
Terrorist Attack: एकामागून एक 3 वाहने उडवली... कराची-क्वेट्टा महामार्गावर पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, 32 सैनिक ठार

हाफिज सईदवर 10 मिलियन डॉलरचे बक्षीस

हाफिज मुहम्मद सईद हा 2008 मध्ये मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. तो लष्कर-ए-तैय्यबाचा सह-संस्थापक आणि जमात-उद-दावा चा प्रमुख आहे. भारत, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघाने हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास अमेरिकेने 10 मिलियन डॉलर बक्षीस जाहीर केले आहे 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय सैन्याने (Indian Army) हाफिज सईदच्या तळावर हल्ला केला, ज्यात तो बचावला पण त्याचे कुटुंबीय मारले गेले. याच घटनेचा बदला घेण्यासाठी हाफिज हल्ल्याची योजना आखत आहे.

हाफिज सईदच्या या नव्या कटामुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमांवरील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहणे आवश्यक बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com