Sunil Khawtankar On Suleman Khan Video Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan: फरार सुलेमानचा Video कसा मिळाला? काँग्रेस नेते सुनील कवठणकरांची ओल्ड गोवा पोलिसांकडून 2 तास परेड

Sunil Khawtankar On Suleman Khan Video: मी पोलिसांना सर्व माहिती दिलीय, माझ्याकडे लपण्यासारखे काहीच नाही, असे कवठणकर म्हणाले.

Pramod Yadav

जुने गोवा: जमीन घोटाळा प्रकरणातील कोठडीतून फरार झालेला आरोपी सुलेमान खानचा व्हिडिओ कसा मिळाला तसेच, आप नेते अमित पालेकरांनी व्हिडिओबाबत केव्हा संपर्क साधला? यावरुन काँग्रेस नेते सुनील कवठणकरांची ओल्ड गोवा पोलिसांकडून 2 तास चौकशी करण्यात आली. कवठणकरांना भारतीय न्याय संहिता कलम १७९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती.

कोठडीतून फरार झाल्यानंतर सुलेमान खान याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. हा व्हिडिओ आप नेते अमित पालेकर यांच्या मदतीने काँग्रेस नेते सुनील कवठणकरांनी माध्यामांना दिला. यावरुन ओल्ड गोवा पोलिसांनी कवठणकरांची आज (१७ डिसेंबर) दोन तास चौकशी केली. सुलेमानचा व्हिडिओ कसा मिळाला, पालेकरांनी संपर्क कधी साधला? मी पोलिसांना सर्व माहिती दिलीय, माझ्याकडे लपण्यासारखे काहीच नाही, असे कवठणकर म्हणाले.

मी राहुल गांधींचा सैनिक आहे. सर्व विरोधक माझ्या समर्थनात आहेत. मी घाबरलो नाहीए, सर्वकाही पारदर्शक आहे. ही केस क्लिअर कट आहे, असे कवठणकर म्हणाले.

कठवणकरांना तीन व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह मिळाला. त्यात सुलेमान खानचाही व्हिडिओ होता. यानंतर पोलिस महासंचालकांना संपर्क साधून माहिती दिल्याचे कवठणकरांनी सांगितले. व्हिडिओसाठी डिआयजी कडून फोन आला. पेन ड्राईव्ह घेऊन जाण्यासाठी पोलिस माझ्या घरी येणार होते, पण ते फारकाळ वाट पाहिल्यानंतरही ते आले नाहीत, असे कवठणकरांनी माध्यमांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT