Casinos in Goa| Deltin casino news  Dainik Gomantak
गोवा

Pernem News : ‘त्या’ कॅसिनोत 90 टक्के रोजगार कसा दिला ? पेडणेवासीयांचा सवाल

मंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीवर संताप

दैनिक गोमन्तक डिजिटल

धारगळ पंचायत क्षेत्रात होऊ घातलेल्या डेल्टा कंपनीच्या कॅसिनोविषयी विधानसभेत मंत्री माविन गुदिन्हो यांनी 90% स्थानिक अर्थात पेडणेकरांनाच रोजगार दिल्याचे जाहीर करून चुकीची माहिती दिल्याबद्दल पेडणेवासीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

धारगळ येथील कॅसिनो अजून सुरू झाला नसल्याने नोकऱ्या कुणाला दिल्या, हेही त्यांनी जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मंजूर केलेल्या सात प्रस्तावांत धारगळ येथील पंचतारांकित कॅसिनोच्या प्रस्तावाचा समावेश आहे. कंपनीकडून धारगळ येथे चार लाख 27 हजार 50 चौरस मीटर जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून 4 हजार रोजगार निर्मिती होईल, अशी हमी कंपनीने यापूर्वीच सरकारला दिलेली आहे.

पेडणे तालुका हा सांस्कृतिक कलेचा वारसा जपणारा तालुका म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात आता सरकार विविध प्रकारचे कॅसिनो आणून युवा पिढीला जुगारास प्रवृत करत आहे.

रोजगार देण्याऐवजी गॅम्बलिंग झोन करून सरकार काय साध्य करू पाहतेय, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

या प्रकल्पात काय काय असणार?

या प्रकल्पामध्ये पंचतारांकित पाच हॉटेल्स, कन्व्हेन्शन सेंटर, मल्टिप्लेक्स, सिनेमा रिटेल एरिया, बँक सुविधा, चिल्ड्रन एन्टरटेन्मेंट एरिया यांचा समावेश असणार आहे.

या प्रस्तावात नमूद केलेली बहुतांश शेतजमीन असून ती तिळारी पाटबंधारे अंतर्गत पाणलोट क्षेत्रातील असल्याची माहिती आता समोर आली आहे. जयदेव मोदी यांची कंपनी आहे. भारतातील कॅसिनो उद्योग जगताचे ते किंग समजले जातात.

"विधानसभेत चुकीची माहिती देणे बरोबर नव्हे. विमानतळासंदर्भातही चुकीची आकडेवारी देण्यात आली होती. आयुषमध्ये तर स्थानिकांचा विचार न करता मुलाखती सध्या सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. मंत्री माविन गुदिन्हो यांनी स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यास वस्तुस्थिती समजेल."

-सुबोध महाले, सरपंच मोपा

कॅसिनो असो वा इतर प्रकल्प. पेडणेकरांच्या तोंडावर फक्त नोकऱ्यांचे गाजर फेकले की झाले, अशी धारणा एकंदरच सरकारने किंवा मंत्री, आमदारांनी करून घेतली आहे,असे वाटते.नव्हे ते पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.

- गोपाळ भिसी शेट्ये, अग्निशमन अधिकारी (निवृत्त),धारगळ .

पेडणेवासीयांना आणि स्थानिक आमदाराला सरकारातील मंत्री गृहीत धरत आहेत. आयुष हॉस्पिटल, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या पेडण्यातील प्रकल्पांत स्थानिकांना नोकऱ्या देण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

आता कॅसिनोत रोजगार देण्याचे गाजर सरकार दाखवत आहे.ज्या प्रकल्पाच्या कामालाच अजून सुरुवात झालेली नाही, त्या प्रकल्पात ९० टक्के रोजगार मंत्र्यांनी कसा काय दिला.

- ज्ञानेश्वर वरक, धारगळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT