Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Quepem Housie: केपेत 28, 4 लाखांच्या ‘हाऊजी’! ‘म्‍युझिकल शो’च्‍या नावाखाली फोफावतोय जुगार; प्रशासनाची डोळेझाक

Housie In Goa: दक्षिण गोव्‍यात सगळीकडेच ‘म्‍युझिक शो’च्‍या नावावर हा ‘हाऊजीं’चा जुगार चालू असून या ‘हाऊजीं’मुळे आयोजक लाखाे रुपयांचा स्‍वत:चा फायदा करून घेत आहेत.

Sameer Panditrao

मडगाव: केपे क्रीडा संकुलात काल सोमवारी ‘म्‍युझिकल शो’च्‍या नावाने ८ लाखांचे बक्षीस असलेला ‘हाऊजी शो’ आयोजित केल्‍यानंतर आता प्रशासनाच्‍या नाकावर टिच्‍चून येत्‍या आठवड्यात केपेतच असे आणखी दोन ‘हाऊजी शो’ आयोजित करण्‍यात आले असून त्‍यातील एका ‘शो’मधील ‘हाऊजी’च्या बक्षिसांची एकूण रक्‍कम तब्‍बल २८ लाख रुपये आहे, तर दुसऱ्या ‘शो’मधील ‘हाऊजी’च्‍या बक्षिसाची रक्‍कम ४ लाख रुपये आहे.

सर्वांत महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे या दोन्‍ही ‘शों’ची सार्वजनिकरित्‍या जाहिरातही दणक्‍यात चालू आहे. एका बाजूने पोलिस महासंचालक गोव्‍यात हाऊजीवर निर्बंध आणले आहेत असे सांगत असतानाच दक्षिण गोव्‍यात सगळीकडेच ‘म्‍युझिक शो’च्‍या नावावर हा ‘हाऊजीं’चा जुगार चालू असून या ‘हाऊजीं’मुळे आयोजक लाखाे रुपयांचा स्‍वत:चा फायदा करून घेत आहेत.

अशा रुपात आलेल्‍या महसुलावर कायद्याने २८ टक्‍के जीएसटी कर भरणे आवश्‍‍यक आहे. मात्र, या सर्वांना फाटा देत आयोजक आपल्‍या तुंबड्या भरत असून प्रशासनही त्‍याकडे डोळेझाक करत असल्‍याचा अनुभव वारंवार येऊ लागला आहे.

काल सोमवारी केपे येथे स्‍पोर्टस्‌ कॉम्‍प्‍लेक्‍सवर आयोजित केलेल्‍या अशाच एका हाऊजीचे आयोजन असलेल्‍या म्‍युझिकल शोमुळे सध्‍या हा विषय ऐरणीवर आला आहे. या शोसाठी आयरिश डिसिल्‍वा नावाच्‍या व्‍यक्‍तीने स्‍पोर्टस्‌ कॉम्‍प्‍लेक्‍स बुक केला होता. म्‍युझिकल शो आयोजित करण्‍याच्‍या नावावर हे बुकींग झाले होते. मात्र, या शाेमध्‍ये म्‍युझिकल शो नावापुरता आणि हाऊजी मुख्‍य शो असे त्‍याचे स्‍वरुप होते. या शोला लोकांची एवढी गर्दी झाली होती की आयोजकांनी त्‍यातून प्रचंड कमाई केल्‍याचे सांगण्‍यात येते.

५ व ८ रोजी दोन ‘म्युझिकल शो’

केपेत शनिवारी म्‍हणजे ५ एप्रिल रोजी आणि मंगळवार ८ एप्रिल रोजी असे दोन ‘म्‍युझिकल शो’ आयोजित केले आहेत. ५ एप्रिल रोजी केपे क्रिएटर्स या संस्‍थेने आयोजित केला असून केपे नगरपालिका उद्यानात तो होणार आहे. यात ‘हाऊजी’ची एकूण बक्षिसांची रक्‍कम ४ लाख आहे. ८ एप्रिलला पुन्‍हा एकदा केपे स्‍पोर्टस्‌ कॉम्‍प्‍लेक्‍सवर सीशेल्‍स केपे या संस्‍थेने ‘म्‍युझिकल शाे’ आयोजित केला असून त्याची रक्‍कम तब्‍बल २८ लाख रुपये आहे.

पोलिसांना चौकशीचे आदेश

दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकारी ॲग्‍ना क्‍लिटस यांच्‍याकडे काल यासंदर्भात तक्रार केल्‍यानंतर त्‍यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांना चौकशी करण्‍याचे आदेश दिले असून त्यांनी केपे पोलिसांना यासंदर्भात चाैकशी करण्यास सांगितले आहे. केपेच्‍या उपजिल्‍हाधिकारी कार्यालयातूनही यासंदर्भात चौकशी चालू आहे. उपजिल्‍हाधिकारी कार्यालयातून जी माहिती प्राप्‍त झाली आहे, त्‍यात या ठिकाणी फक्‍त ‘म्‍युझिकल शो’ आयोजित करण्‍याची परवानगी देण्‍यात आली होती. ‘म्‍युझिक शो’ व्‍यतिरिक्‍त अन्‍य कुठल्‍याही प्रकारचे आयोजन करण्‍यास सक्‍त मनाई करण्‍यात आली होती. असे असतानाही हे सर्व निर्बंध फाट्यावर बसवून ‘हाऊजी’चे आयोजन केले गेले आहे.

क्रीडा संकुलाने परवानगी नाकारली

सोमवारी केपेत झालेल्‍या ‘हाऊजी शो’ची दै. ‘गोमन्‍तक’ने फोटोसह बातमी प्रसिद्ध केल्यानंतर जाग आलेल्‍या प्रशासनाने आता प्रतिबंधक उपाय घेणे सुरू केले आहे. ८ एप्रिलच्‍या ‘म्‍युझिक शो’साठी केपे क्रीडा संकुल आरक्षित करण्‍यासाठी आयोजक आले होते. मात्र, कॉम्‍प्‍लेक्‍स व्‍यवस्‍थापक नितीन देसाई यांनी आपण ‘शाे’ला परवानगी देणार नाही असे सांगून या आयोजकांना परत पाठविले. दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकारी ॲग्‍ना क्‍लिटस यांना विचारले असता, दक्षिण गोव्‍याच्‍या पोलिस अधीक्षकांना असे ‘शो’ आयोजित होता कामा नयेत यासाठी स्‍पष्‍ट ताकीद दिली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT