Housie Gambling: केपे स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये 8 लाखांची हाऊजी, परिसराला जत्रेचे स्वरूप; तक्रार करूनही रात्री ‘शो’, पोलिसांचे दुर्लक्ष

Housie Scam Goa Quepem: आयोजनामुळे केपे क्रीडा संकुलाकडे एव्हढे लोक जमले होते की या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात लाखो रुपयांची बक्षिसे असणारी हाऊजी चालू देणार नाही, अशी घोषणा पोलिस महासंचालकांनी केला असला तरी केपे येथील सरकारी जागा असलेल्या स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये चक्क आठ लाख इनाम असलेली हाऊजी बिनदिक्कतपणे संपन्न झाली.

या संदर्भात तक्रार करण्यासाठी दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा यांच्याशी संपर्क करण्यासाठी वारंवार फोन केला तरी त्यांनी फोन उचलला नाही. केपेचे उपाधीक्षक सागर एकोस्कर यांच्या बाबतीतही तोच अनुभव आला.

केपेचे मामलतदार नाथन आफोन्‍सो यांच्याशी संपर्क साधला असता तुम्ही केपे पोलिसांकडे संपर्क साधा, असे त्यांनी सांगितले. केपे येथे या हाऊजीचे आयोजन केले जाणार अशी जाहिरात उघडपणे केली जात असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केले होते.

Goa Crime News
Goa Crime: दिल्लीतून गोव्यात आला बनावट पोलिस अधिकारी, व्यावसायिकाचा शूट केला अश्लील व्हिडिओ; Video Viral करण्याची धमकी देत उकळले 30 लाख

या आयोजनामुळे केपे क्रीडा संकुलाकडे एव्हढे लोक जमले होते की या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते. याठिकाणी वाहतूक पोलिस होते; पण त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती.

Goa Crime News
Goa Crime: डॉक्टरला लावला 1.26 कोटी रुपयांचा चुना; अस्तित्वात नसलेल्या बंगल्याची केली विक्री

या हाऊजी कार्यक्रमांमुळे स्थानिकाना त्रास झाला; पण पोलिसांकडे तक्रार करूनही त्याचा काही फायदा झाला नाही. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही या प्रकरणी दखल घेऊ, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या शोच्यावेळी ५ एप्रिल रोजी केपे नगरपालिका चौकात असा आणखी एक हाऊजी शो होणार असे जाहीर करण्यात आले. एका हाऊझी स्लिपसाठी एक हजार रुपये आकारले जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com