Rainwater harvesting In Goa Dainik Gomantak
गोवा

Rainwater harvesting In Goa: राज्यात रेन वॉटर हार्वेस्‍टिंगसाठी घरांना मिळणार 50 टक्‍के अनुदान

धोरणांतर्गत पावसाचे पाणी साठविणे, भूजलाचे पुनर्भरण करणे आणि जल व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा सरकारने काल ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग धोरण 2022’ अधिसूचित केले असून त्यासाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. धोरणांतर्गत पावसाचे पाणी साठविणे, भूजलाचे पुनर्भरण करणे आणि जल व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

(Rainwater harvesting In Goa)

धोरणानुसार दोन हजार चौरस मीटर आणि जास्त क्षेत्रफळावरील निवासी संकुलांसाठी ते अनिवार्य आहे. दीड हजार चौरस मीटर आणि जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडावरील व्यावसायिक संकुल आणि दहा हजार चौरस मीटर आणि जास्त क्षेत्रफळावरील औद्योगिक युनिट्स, तसेच सर्व सरकारी इमारती

आणि सरकारी शाळा व महाविद्यालयांत रेन वॉटर हार्वेस्टिंग हाती घेणे आवश्‍यक असल्याचे धोरण स्पष्ट केले आहे. धोरणात प्रत्येक प्रकारच्या इमारती किंवा घरासाठी प्रतिपूर्ती आधारावर अनुदानदेखील निर्दिष्ट केले आहे.

1 वैयक्तिक कुटुंबांसाठी किंवा निवासी घरांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम समाविष्ट करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या 50 टक्केपर्यंत अनुदान किंवा एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल.

2 निवासी संकुले, इमारती, खासगी गृहनिर्माण संस्था, खासगी शाळा, महाविद्यालय यांच्यासाठी खर्चाच्या 50 टक्केपर्यंत किंवा पाच लाख रुपये, यापैकी जे कमी असेल ते प्रदान केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT