Goa Temple
Goa TempleDainik Gomantak

Goa Temple: पोर्तुगिजांकडून उद्ध्वस्त धार्मिक स्थळांबाबत पुरातत्त्व खात्याकडे एकूण 15 निवेदने

एकूण 15 सूचना : डिचोली, चोडण, दिवाडीतील देवस्थानांचा समावेश
Published on

पणजी: पोर्तुगीज शासकांनी उद्ध्वस्त केलेली देवस्थाने किंवा गोव्यावर पोर्तुगीज राजवटीचा अंमल असतानाच्या काळात नष्ट केल्या गेलेल्या ऐतिहासिक स्थळांविषयी नागरिक, बिगर सरकारी संस्था, संघटना यांच्याकडून 30 नोव्हेंबरपर्यंत निवेदने मागविण्यात आली होती. त्यानुसार पुरातत्त्व खात्याकडे एकूण 15 निवेदने आलेली आहेत.

(response to a statement from Portuguese regarding destruction of religious sites in goa)

Goa Temple
Old Goa Feast: फेस्तमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ; FDA चा छापा, अनेक स्टॉल सील

प्रस्तुत निवदने, देवस्थान, संस्था व व्यक्तीशः स्वरूपात आलेली आहेत. खात्याद्वारे, कागदपत्रे, छायाचित्रे आदींच्या पुराव्यासह मागविण्यात आली होती. आलेल्या निवेदनांपैकी बहुतांश निवदने ही अभ्यासण्यायोग्य आहेत. काही निवेदने पुस्तकांच्या आधारे आहेत तर एक निवेदन हे इतिहास आणि पुरातन स्थळे संवर्धनाविषयी कार्य करणाऱ्या नागपूरच्या संस्थेचे असल्याचे सांगण्यात आले.

पुस्तकांच्या आधारे निवदने

खात्याकडे आलेल्या निवेदनांमध्ये काही निवेदने ही पुस्तकांच्या आधारे करण्यात आलेली आहेत. गोवा इंक्विजिशनवर आधारित पुस्तक तसेच एका व्यक्तीने पोर्तुगीज कालखंडात अस्तित्वात असलेल्या देवस्थानांची यादी खात्याला पाठविली आहे.

देवस्थानांची नावे

पुरातत्त्व खात्याच्या निवेदनाला प्रतिसाद देत काही देवस्थानांद्वारे पोर्तुगीज काळात उद्‌ध्वस्त केल्याचा दाखला देत निवेदने देण्यात आली आहेत. त्यातील काही देवस्थानांची नावे खालीलप्रमाणे-

  • श्री देवकीकृष्ण देवस्थान, चोडण

  • महादेव देवस्थान, दिवाडी

  • देवनारायण, डिचोली

  • रामचंद्र देवस्थान, गिमोणे-डिचोली

  • विजयादुर्गा देवस्थान, सांकवाळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com